मुंबई - मुंबईत गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. मात्र गेल्या काही दिवसात घट झाल्या मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. आज (शुक्रवार) 1 हजार 657 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 62 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 2 हजार 572 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील काही दिवसापासून बाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक आहे.
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 199 दिवसांवर -
मुंबईत आज 1 हजार 657 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 85 हजार 705 वर पोहचला आहे. तर 62 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 14 हजार 138 वर पोहोचला आहे. तसेच 2 हजार 572 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 31 हजार 982 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 37 हजार 656 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 199 दिवस इतका आहेत. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 85 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेन्टमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. शहरातील 377 इमारतीत कोरोना रुग्ण आढळून आल्याने त्या सील करण्यात आल्या आहेत. आज 25 हजार 205 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. तर आतापर्यंत एकूण 58 लाख 51 हजार 279 चाचण्या करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.