ETV Bharat / city

लता मंगेशकर दुखवटा, राज्यातील केंद्रिय बँकाही राहणार बंद - गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन

राज्य सरकारने लता मंगेशकर यांच्या निधनामुळे ( Lata Mangeshkar Passes Away ) राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे राज्यातील बँका सुरु राहणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आरबीआयने आता यासंदर्भात माहिती दिली आहे.

Banks
Banks
author img

By

Published : Feb 7, 2022, 7:17 AM IST

मुंबई - भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन ( Lata Mangeshkar Passes Away ) झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर ( Maharashtra Government Public Holiday ) केली आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज बंद ठेवले जातील. मात्र, केंद्र सरकारच्या अख्यत्यारीतील बँका सुरु राहतील का नाही, यासंदर्भात अनेकांना संभ्रम निर्माण झाला आहे.

केंद्र सरकार अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ( Reserve Bank Of India ) अखत्यारित एसबीआय, बँक ऑफ इंडिया या सरकारी आणि इतर खासगी बँका येतात. म्हणून त्यांच्यावर राज्य सरकारचे निर्णय लागू होत नाही. केंद्र सरकारनेही तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. मात्र, सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही. त्यामुळे आता आरबीआयने याबाबत माहिती दिली आहे.

  • As Maharashtra govt has declared February 7 as a public holiday, there will be no transactions & settlements in Government securities (primary and secondary), foreign exchange, money markets, and Rupee Interest Rate Derivatives: RBI

    — ANI (@ANI) February 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आरबीआयने म्हटलं ( Rbi On Public Holiday ) की, महाराष्ट्र वगळून देशातील बँका आज सुरु राहतील. महाराष्ट्रातील बँका, वित्तीय संस्था बंद राहतील, असे आरबीआयने स्पष्ट केले. त्याचसोबत, पेंडिंग व्यवहार 8 फेब्रुवारीला पुर्ण करण्यात येतील, असेही आरबीआयने सांगितले आहे.

हेही वाचा - Priyanka Gandhi Goa Visit : काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी सोमवारी गोव्याच्या दौऱ्यावर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.