ETV Bharat / city

Lata Mangeshkar Birth Anniversary : लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंची भावनिक पोस्ट

author img

By

Published : Sep 28, 2022, 2:29 PM IST

ता मंगेशकर ( Singer Lata Mangeshkar  ) आजही आपल्या गाण्यांमधून आपल्या आठवणीत आहेत. 28 सप्टेंबर आज लता मंगेशकर यांची जयंती ( Lata Mangeshkar birth anniversary ) आहे. लता मंगेशकर यांच्या अशाच काही आठवणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ( Maharashtra Navnirman Sena ) अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी काढल्या आहेत.

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई - गान कोकिळा लता मंगेशकर ( Singer Lata Mangeshkar ) आजही आपल्या गाण्यांमधून आपल्या आठवणीत आहेत. 28 सप्टेंबर आज लता मंगेशकर यांची जयंती ( Lata Mangeshkar birth anniversary ) आहे. संपूर्ण देश लता मंगेशकर यांची आठवण काढत आहे. लता मंगेशकर यांची जयंती चाहत्यांसाठी एखाद्या सेलिब्रेशनपेक्षा कमी नव्हता. पण आज लतादीदींची आठवण आल्यावर चाहत्यांचे डोळे ओलावतात. लता मंगेशकर या प्रत्येक गायिकेचा आदर्श राहिल्या आहेत. आजही लतादीदींची सदाबहार गाणी ( Lata Mangeshkar evergreen songs ) ऐकून चाहते संमोहित होतात. लता मंगेशकर यांच्या अशाच काही आठवणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ( Maharashtra Navnirman Sena ) अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी काढल्या आहेत.

ठाकरे मंगेशकर कुटुंबाचे संबंध - ठाकरे परिवार आणि मंगेशकर परिवाराचे संबंध सुरुवातीपासून तसे अतिशय घरगुती व जिव्हाळ्याचे आहेत. हे आजही ऋणानुबंध तसेच टिकून आहेत. लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे असतील यांनी स्वतः शिवाजी पार्कवर येऊन लता दीदींना आदरांजली वाहिली होती. त्यानंतर देखील अनेक वेळा राज ठाकरे यांनी लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आज त्यांच्या जयंती निमित्त राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहित लता मंगेशकर यांना अभिवादन केलं आहे.

काय म्हटलंय राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये? लतादीदींची आज जयंती. आपल्याला वाढदिवसाच्या मिळणाऱ्या शुभेच्छांचा आनंद असतोच, पण आपल्याला एखाद्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात पण विशेष आनंद असतो, त्या व्यक्तींमध्ये दीदी होत्या. त्यांना थेट शुभेच्छा देण्याचा आनंद मला दोन दशकांहून अधिक काळ मिळाला, हे माझं भाग्यच. दीदी गेल्यापासून मी त्यांच्याबद्दल फारसं कुठेच बोललो नाही, सार्वजनिक व्यासपीठावर तर नाहीच नाही. दीदींच्या निधनानंतर एक रितेपण जाणवायला लागलं, ह्या रितेपणाच्या तीव्रतेचा अंदाज येण्यातच मधले काही महिने निघून गेले.

दीदीच्या गाण्याबद्दल लिहिणं शक्यच - दीदीबद्दल काही लिहायचं ठरवलं तर, त्यांच्या गाण्याबद्दल लिहिणं शक्यच नाही, ते इतकं अत्युच्च आहे की कितीही त्याला शब्दांत पकडायचं ठरवलं तरी हातातून काहीतरी निसटतच राहतंय असं वाटत राहणार. पण त्यांचं गाणं जसं दैवी होतं, तसाच त्यांच्या व्यक्तिमत्वात एक दैवी अंश होता. ज्याची भुरळ मला त्यांना पहिल्यांदा भेटलो तेंव्हा पडली. ती कायम राहिली, पुढेही राहील. हल्ली 'ब्रँड' हा शब्द प्रचलित आहे, किंवा राजकीय,सामाजिक जीवनात 'करिष्मा' हा शब्द वापरतात, हे निर्माण करण्यासाठी प्रचंड अट्टाहास केला जातो. अशा अट्टाहासातून, 'ब्रँड', 'करिष्मा' काहीकाळ निर्माण होतो पण तो ओसरतो, निसटून जातो. पण दीदींच्या बाबतीत ते नैसर्गिकपणे आणि सहज घडत गेलं. ती घडण्याची प्रक्रिया त्याचं अंतिम टोक ह्या दोन्हींबद्दल दीदी अनभिज्ञ अलिप्त राहिल्या, हे दुर्मिळ आहे.

आयुष्यात फक्त गाणं ह्या एका गोष्टीवर कमालीचं प्रेम त्या करत, ते आत खोल रुजवत पुढे ते लोकांसमोर ठेवायचं. ते गाणं वरवर सोपं वाटावं पण ते तितकंच कोणालाच पूर्ण गवसू नये इतकं मोठं, अशी साधना केल्यावर जी शांतता, सहजता दीदींच्या वागण्यात आली होती, तिचं वर्णन करायला ऋषितुल्य हाच शब्द मलातरी सुचतोय.
हे असलं सगळं दैवी असतं, ते कधीतरी एकदाच येतं. हे भव्य, तरीही अमूर्त वाटणारं 'दर्शन' मला अनेकदा जवळून होऊन गेलं. आयुष्यात सर्वोच्च काय असतं हे पाहणं. ते अनुभवणं हे भाग्य मला लाभलं हाच माझ्या आयुष्यातील खूप मोठा आनंद. दीदी जिथे असतील तिथे त्यांना माझा नमस्कार.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.