मुंबई - निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शनिवारी सायंकाळी सहा वाजता प्रचाराची सांगता होणार आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराची धामधुम आज थांबणार आहे. प्रचाराची सांगता दणक्यात करण्यासाठी सर्व उमेदवार आणि पक्षांनी नियोजन केल्याचे दिसत आहे. मात्र, जाहीर प्रचार संपणार असला तरी रविवारच्या सुटीमुळे उमेदवारांचा छुपा प्रचारावर जोर राहणार आहे.
हेही वाचा... पाऊस.. प्रचार अन् पवार...
अत्यंत चुरशीने लढवली जात असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी संध्याकाळी थंडावणार आहेत. गेले महिनाभर आरोप प्रत्यारोप, एकमेकांवर डागलेल्या तोफा आणि नेत्यांची घणाघाती भाषणे, जाहिरातींचा भडिमार यामुळे या निवडणुकीत कमी वेळातच प्रचाराचा मोठा धुराळा उडालाय. या धुराळ्यात सर्वसामांन्यांचे प्रश्न मात्र बाजुला पडलेत. केंद्रात सत्तेत आलेल्या भाजपने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रचारात उतरवत निवडणुक भाजपसाठी प्रतिष्ठेची असल्याचे स्पष्ट केले. मोदींसोबत भाजपने राज्यातील आणि केंद्रातील नेत्यांची मोठी फौजच रणांगणात उतरवली.
हेही वाचा... महाराष्ट्राच्या प्रचार मैदानातून सोनियांची माघार?
भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा घेण्यात आल्या होत्या. तर सेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सभा घेण्यात आल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राजस्थानचे मध्यप्रदेशचे नेते ज्योतिरादित्य शिंदे, उपमुख्यमंत्री सचिन पायलट, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या, प्रवक्ते सचिन सावंत आदींनी प्रचारार्थ सभा घेऊन रान उठविले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार, अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ यांच्याही विविध ठिकाणी सभा झाल्या आहेत. मनसेकडून राज ठाकरे, वंचितकडून प्रकाश आंबेडकर, एमआएमकडून असुद्दीन ओवैसी, इम्तियाज जलील यांनी सभा घेतल्या आहेत.
हेही वाचा... 'जनतेचे लक्ष ज्वलंत प्रश्नांवरून वळविण्यासाठीच पुढे आणलाय 'भारतरत्न'चा मुद्दा..'
राज्यात आज दिग्गजांच्या सभा
प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने केंद्रातील आणि राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांच्या सभांचे आयोजन आज करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांचे नातू रोहित पवार व भाजपचे मंत्री राम शिंदे यांच्यामध्ये सरळ लढत होत आहे. कर्जतमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची सभा होणार आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची जत आणि शिराळा येथे सभा घेणार आहेत. तर सांगलीत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ शहरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत रॅली काढून प्रचाराची सांगता केली जाणार आहे.
हेही वाचा... ऑनलाईन कॅम्पेनद्वारे देणगी मिळवण्यात 'वंचित' सर्वात आघाडीवर
अमित शाह यांची सकाळी खानदेशात तर दुपारी अकोले, कर्जत-जामखेड येथे सभा होणार आहे. राज ठाकरे यांची ठाण्यात सभा असेल. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर येथे शेवटच्या दिवशी रोड शो करणार आहे. आदित्य ठाकरे यांचे मुंबईत बाईक रॅली आयोजन करण्यात आले आहे. कर्जत प्रमाणेच शरद पवार आणि राष्ट्रवादी नेत्यांची बारामती येथे प्रचार सांगता होणार आहे. उद्धव ठाकरे यांची शेवटची सभा साताऱ्यातील दहिवडी येथे होणार आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मालाड रोड शो करणार आहेत.