ETV Bharat / city

Venkateshwara temple in Navi Mumbai : नवी मुंबईतील व्यंकटेश्वरा मंदिरासाठी तिरुपती देवस्थानास भाडेतत्वावर जमीन - मंत्री एकनाथ शिंदे - नवी मुंबईतील व्यंकटेश्वरा मंदिरासाठी जमीन भाड्याने

नवी मुंबईतील उलवे नोड येथे व्यंकटेश्वराचे मंदीर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानास भाडेपट्टयाने जमीन देण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली.

eknath shinde
मंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Apr 21, 2022, 7:35 AM IST

मुंबई - नवी मुंबईतील उलवे नोड येथे व्यंकटेश्वराचे मंदीर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानास भाडेपट्टयाने जमीन देण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर ते मंत्रालयात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शहर पातळीवरील सुविधा म्हणून विशेष प्रकल्पाअंतर्गत श्री. व्यंकटेश्वराचे मंदीर उभारणीसाठी उलवे नोडमधील सेक्टर-12, भुखंड क्र.3 येथे जमीन देण्यात येणार आहे. त्यानुसार उलवे नोडमधील सेक्टर-12, भुखंड क्र.3 (एकूण क्षेत्र 40,400 चौ.मी.) 1.00 चटईक्षेत्र निर्देशांकासह भाडेपट्टयाने थेट वाटप करण्यासही मान्यता देण्यात आल्याचे मंत्री शिंदे यांनी सांगितले.

देशात अनेक ठिकाणी उभारले श्री व्यंकटेश्वराचे मंदीर - तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डातर्फे देशात हैद्राबाद, चेन्नई, कन्याकुमारी, बंगलुरु, विशाखापट्टनम, भुवनेश्वर, जम्मू, नवी दिल्ली, कुरुक्षेत्र व ऋषिकेश या ठिकाणी शहर पातळीवरील सुविधा म्हणून भगवान श्री व्यंकटेश्वराचे मंदीर उभारणी करण्यात आली आहे. या धर्तीवर नवी मुंबईमध्ये मंदिर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानाने जमीन उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती.

नवी मुंबईतील श्री व्यंकटेश्वराचे मंदीर भाविकांसाठी तसेच पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. त्यामुळे त्या परिसराला धार्मिक व सामाजिक महत्त्व प्राप्त होऊन स्थानिक परिसरात रोजगार संधी निर्माण होतील. या देवस्थानामार्फत या परिसरात अनेक समाज उपयोगी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. सर्व बाबींचा विचार करुन एक विशेष बाब म्हणून हा भूखंड उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.