मुंबई - मुंबईची लाईफलाईन असलेल्या बेस्टकडून खासगी ( Mumbai Best Bus ) बसेस चालवल्या जात आहेत. या खासगी बसवर आता महिला चालकांची ( Women Driver On Best Bus ) नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या आठवडाभरात या महिला चालक मुंबईत बस चालवताना दिसणार आहेत. यात रिक्षा चालक ते बस चालक असा प्रवास करणाऱ्या लक्ष्मी जाधव ( Lakshmi Jadhav First Women Best Driver ) यासुद्धा एक चालक आहेत.
बेस्टमध्ये महिला चालक - १९२६ पासून बेस्ट उपक्रमाकडून मुंबईकरांना परिवहन सेवा दिली जात आहे. बेस्ट उपक्रम गेल्या काही वर्षांत आर्थिक संकटात आला आहे. यामुळे खासगी कंत्राटदाराकडून बसेस चालवल्या जात आहेत. या खासगी बसेस वर आता महिला चालकांची नियुक्ती केली जाणार आहे. सुरुवातीला तीन महिला चालकांची निवड करण्यात आली आहे. त्यांना सध्या ट्रेनिंग देण्याचे काम सूरु असून येत्या आठवडाभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या महिला चालकांना अधिकृत रित्या बस चालवण्यासाठी नियुक्ती केली जाणार आहे.
रिक्षा चालक ते बस चालक - बेस्टकडून निवड करण्यात आलेल्या तीन महिलांपैकी एक महिला मुलुंड येथील रहिवासी आहे. त्या महिलेचे नाव लक्ष्मी जाधव असे असून २०१६ पासून त्या रिक्षा चालक आहेत. रिक्षा परमिट मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला चालक आहेत. लक्ष्मी जाधव यांनी बिडब्लू आणि मर्सिडीझ सारखी चार चाकी वाहने चालवली आहेत. दरमहा उत्पन्न मिळाले पाहिजे भविष्यातही नोकरीचा उपयोग झाला पाहिजे, यासाठी त्यांनी म्हणून बेस्टच्या चालकाची नोकरी करण्याचा निर्णय घेतला. बेस्टच्या दिंडोशी आगारात त्यांनी आपली चालक म्हणून नोंदणी केल्यावर 2019 मध्ये त्यांना बस चालवण्याची मान्यता मिळाली होती. लक्ष्मी जाधव यांच्यासोबत पती, दोन मुलगे आहेत. एक अभियांत्रिकी आणि दुसरा कॉमर्सचे शिक्षण घेत आहेत.
सध्या ट्रेनिंग सुरू - सध्या आमचे ट्रेनिंग सुरू आहे. येत्या 27, 28 मे ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे येणार आहेत. त्यांच्या पुढे मला बस चालवायची आहे. त्यासाठी आमच्याकडून चांगल्या प्रकारे बस चावण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. रोज मी मजास आगार ते धारावी डेपो अशी बस चालवत आहे, अशी माहिती लक्ष्मी जाधव यांनी दिली.
बेस्टमध्ये वाहकानंतर महिला चालक - बेस्टमध्ये काही वर्षापूर्वी 90 महिला कंडक्टर म्हणजेच वाचकांची भरती करण्यात आली होती. कालांतराने या महिला कंडक्टरना गर्दीच्या वेळी काम देणे योग्य वाटले नाही. यामुळे त्यांना डेपोमध्ये काम देण्यात आले. आता बेस्टमधील खासगी बससाठी महिला ड्रायव्हरची नियुक्ती करण्यात आली आहे.
आठवडाभरात नियुक्ती - बेस्टने आपल्या बसवर महिला चालकांची नियुक्ती केलेली नाही. बेस्टकडून ज्या खासगी बस चालवल्या जात आहेत, त्यावर महिला चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या त्यांना ट्रेनिंग देण्याचे काम सुरू आहे. येत्या आठवड्यात कार्यक्रम घेऊन त्या महिला चालकांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती बेस्टचे जनसंपर्क अधिकारी मनोज वऱ्हाडे यांनी दिली.
हेही वाचा - Monsoon Latest Update : यंदा मान्सून एक आठवडा आधीच, काय आहेत कारणे? पहा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट