ETV Bharat / city

Kranti Redkars Plea : समाज माध्यमांना मानहानिकारक पोस्ट करण्यास मनाई करा- क्रांती रेडकर यांची दिंडोशी न्यायालयात याचिका

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी गुगल, फेसबुक आणि ट्विटर या सोशल मीडियाला आपल्या बाबतीत कोणतेही बदनामी कारक मजकूर अथवा पोस्ट करण्यास प्रतिबंधात्मक आदेश द्यावेत, या मागणीची याचिका मुंबईतील दिंडोशी कोर्टात केली होती. त्यावर ट्विटरने 22 पानी उत्तर ( tweeter reply in Dindoshi court ) दिले आहे. एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांच्याकडून सुरू असलेल्या कायदेशीर कारवाई थांबविण्याची ट्विरटने विनंती केली आहे.

author img

By

Published : Dec 17, 2021, 7:48 PM IST

समीर वानखेडे क्रांती रेडकर
समीर वानखेडे क्रांती रेडकर

मुंबई - एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी बदनामीकारक पोस्टविरोधात सोशल मीडियांकडे मोर्चा वळविला आहे. त्यांनी मुंबईमधील दिंडोशी न्यायालयात याचिका दाखल ( Sameer Wankhedes plea in Dindoshi court ) केली आहे. या याचिकेत फेसबुक, ट्विटर आणि इतर समाज माध्यमांना कोणतीही मानहानिकारक पोस्ट करण्यास मनाई करण्यात यावी, अशी याचिकेतून ( restrict posting defamatory on social media ) विनंती करण्यात आली आहे.

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी गुगल, फेसबुक आणि ट्विटर या सोशल मीडियाला आपल्या बाबतीत कोणतेही बदनामी कारक मजकूर अथवा पोस्ट करण्यास प्रतिबंधात्मक आदेश द्यावेत, या मागणीची याचिका मुंबईतील दिंडोशी कोर्टात केली होती. त्यावर ट्विटरने 22 पानी उत्तर ( tweeter reply in Dindoshi court ) दिले आहे. एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांच्याकडून सुरू असलेल्या कायदेशीर कारवाई थांबविण्याची ट्विरटने विनंती केली आहे. वानखेडे यांचा अर्ज चुकीचा आणि तथ्यहीन असल्याचे ट्विटरने 22 पानांच्या उत्तरात म्हटले आहे.

हेही वाचा-Osmanabad Supari Killer Arrested : संपत्तीच्या वादातून जीवे मारण्यास सांगितले, सुपारी किलरला पोलिसांनी पिस्तुलासह पकडले

पुढील सुनावणी 21 डिसेंबर रोजी

दिंडोशी न्यायालयाने दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून घेतले. दिंडोशी न्यायालय पुढील सुनावणी 21 डिसेंबर 2021 ( Kranti Redkar plea in Dindoshi court ) ला सकाळी वाजता घेणार असल्याचे समीर वानखेडे यांच्या वकिलांनी सांगितले.

हेही वाचा-Women Doped For Marriage In Thane : लग्नाचे आमिष दाखवत 26 महिलांची अडीच कोटीने फसवणुक करणारा लखोबा अटकेत

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या ट्विटविरोधात समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या प्रकरणात मलिक यांना वानखेडे कुटुंबियाविरोधात कोणेतेही वक्तव्य करण्यास मनाई करण्यात आली आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.