ETV Bharat / city

अभिनेत्री क्रांती रेडकरने लाँच केला स्वतःचा ब्रँड, दिलं मुलीचं नाव

अभिनेत्री क्रांती रेडकरने तिच्या नवीन इनिंगला आता सुरुवात केली आहे. नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या एका पार्टीत तिने स्वतः चा कपड्यांचा ब्रँड लाँच केला आहे. तिच्या दोन जुळ्या मुली 'झिया' आणि 'झ्यादा' यांच्या नावाच्या आद्यक्षरांवरून 'झी-झी' असे नाव तिने या आपल्या ब्रँडला दिले आहे.

अभिनेत्री क्रांती रेडकरने लाँच केला स्वतःचा ब्रँड, दिलं मुलीचं नाव
author img

By

Published : Aug 28, 2019, 4:22 AM IST

मुंबईः अभिनेत्री क्रांती रेडकरने तिच्या नवीन इनिंगला आता सुरुवात केली आहे. नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या एका पार्टीत तिने स्वतः चा कपड्यांचा ब्रँड लाँच केला आहे. तिच्या दोन जुळ्या मुली 'झिया' आणि 'झ्यादा' यांच्या नावाच्या आद्यक्षरांवरून 'झी-झी' असे नाव तिने या आपल्या ब्रँडला दिले आहे.

अभिनेत्री क्रांती रेडकरने लाँच केला स्वतःचा ब्रँड, दिलं मुलीचं नाव
क्रांतीच्या या नवीन व्हेंचरला शुभेच्छा देण्यासाठी तिची खास मैत्रीण अभिनेत्री अमृता खानविलकरसह, ऋतुजा देशमुख, हर्षदा खानविलकर आणि निर्मात्या सुचित्रा बांदेकर या उपस्थित होत्या. या सगळ्यांनी मिळून केक कापत क्रांतीला शुभेच्छा दिल्या आहेत.

क्रांतीला आपल्याला स्टायलिंगची उत्तम जाण असल्याचे बऱ्याच दिवसांपासून जाणवत होते. मात्र, या आवडीचं व्यवसायात रूपांतर करण्याचे धाडस नव्हते. मात्र, आता तिने हे शिवधनुष्य पेलायचा निर्णय घेतला असून त्यासाठी लागेल ते सागळं काही करायची तिची तयारी आहे.

कोणत्याही वयाच्या महिलेला आवडतील आणि कोणत्याही प्रसंगी घालता येतील असे कपडे डिझाईन करण्यावर आपला भर असणार असल्याचे तिने सांगितले आहे. काहीसे ट्रॅडिशनल पण तरीही मॉडर्न वाटतील असे कपडे तिने तयार केले असून सुरुवातीला सोशल मीडियाच्या माध्यमातून, ऑनलाइन वेबसाईट्स आणि डिजिटल अँपच्या माध्यमातून हे कपडे ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचा तिचा मानस आहे. याशिवाय गरजेनुसार टेलरमेड कपडेही देणार असल्याचे तिने सांगितले आहे. हे कपडे दिसायला सुंदर असले तरीही फार महाग नसतील. सर्वसामान्य आणि उच्च मध्यमवर्गीय लोकांना परवडतील अशीच त्यांची किंमत असेल असे क्रांतीने यावंळी स्पष्ट केले आहे.

अमृता खानविलकर आणि अक्षय बरदापुरकर यांनी मिळून सुरू केलेल्या 'प्लॅनेट टी' या उपक्रमा अंतर्गत क्रांतीच्या ब्रॅंडचे पूर्ण पब्लिसिटी आणि प्रमोशन हाताळले जाणार आहे. हा ब्रँड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याची ग्वाही अमृताने यावेळी दिली आहे.

Intro:अभिनेत्री क्रांती रेडकरने तिच्या नवीन इनिंगला आता सुरुवात केली आहे. नुकताच मुंबईत पार पडलेल्या एका लौंचिंग पार्टीत तिने स्वतः चा क्लोदींग ब्रँड लाँच केला आहे. तिच्या दोन जुळ्या मुली 'झिया' आणि 'झ्यादा' यांच्या नावाच्या अध्यक्षरावरून 'झी झी' अस नाव तिने या आपल्या ब्रँड साठी ठेवलं आहे.

क्रांतीच्या या नवीन व्हेंचरला शुभेच्छा देण्यासाठी तिची खास मैत्रीण अमृता खानविलकर, अभिनेत्री ऋतुजा देशमुख, अभिनेत्री हर्षदा खानविलकर, अभिनेत्री आणि निर्मिती सुचित्रा बांदेकर या आवर्जून उपस्थित होत्या. या सगळ्यांनी मिळून केक कापून क्रांतीला या नवीन जबाबदारी साठी शुभेच्छा दिल्या.

क्रांतीला बऱ्याच दिवसांपासून आपल्याला स्टायलिंगची उत्तम जाण असल्याचं जाणवत होतं, मात्र या आवडीला व्यवसायात रूपांतरित करण्याचं धाडस तिला होत नव्हतं. मात्र आता अखेरीस तिने हे शिवधनुष्य पेलायचा निर्णय घेतला असून त्यासाठी लागेल ते सार काही करायची तिची तयारी आहे.

कोणत्याही वयाच्या महिलेला आवडतील आणि कोणत्याही प्रसंगी घालता येतील असे कपडे डिझाईन करण्यावर आपला भर असणार असल्याचं तिने सांगितलं. काहीसे ट्रॅडिशनल पण तरीही मोडर्न वाटतील असे कपडे तिने तयार केले असून सुरुवातीला सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि ऑनलाइन वेबसाईट्स आणि डिजिटल अपचा माध्यमातून हे कपडे ग्राहकापर्यंत पोहचवण्याचा तिचा मानस आहे. याशिवाय गरजेनुसार टेलरमेड कपडेही देणार असल्याचे तिने सांगितलं आहे. हे कपडे दिसायला सुंदर असले तरीही अजिबात फार महाग नसतील. सर्वसामान्य आणि उच्च मध्यमवर्गीय लोकांना परवडतील अशीच त्यांची किंमत असेल असं क्रांतीने स्पष्ट केलं आहे.

अमृता खानविलकर आणि अक्षय बरदापुरकर यांनी मिळून सुरू केलेल्या 'प्लॅनेट टी' या उपक्रमा अंतर्गत क्रांतीच्या ब्रॅंडच पूर्ण पब्लिसिटी आणि प्रमोशन हाताळल जाणार आहे. हा ब्रँड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी शक्य ते सार काही करण्याची ग्वाही अमृताने दिली आहे.

तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञ भावे यांनी मिळून सुरू केलेला तेजज्ञा हा ब्रँड चांगलाच यशस्वी झाला. आता क्रांतीच्या झी झी या ब्रॅंडला आगामी सणाच्या काळात कसा प्रतिसाद मिळतो ते पाहुयात.

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.