ETV Bharat / city

मलिक यांनी ट्विट केलेले 'ते' Whats App चॅट्स बनावट; क्रांती रेडकर यांची पोलिसात ऑनलाइन तक्रार

समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर वानखेडे(Kranti Redkar files online Police complaint) यांनी ऑनलाइन पोलीस तक्रार दाखल केली आहे. मंत्री नवाब मलिक(Minister Nawab Malik) यांनी ट्विट केलेल्या काही Whats App चॅट्सच्या स्क्रीनशॉटवरून क्रांती यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

author img

By

Published : Nov 23, 2021, 3:35 PM IST

Updated : Nov 23, 2021, 4:10 PM IST

Kranti Redkar
क्रांती रेडकर

मुंबई - NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर वानखेडे(Kranti Redkar) यांनी ऑनलाइन पोलीस तक्रार(Kranti Redkar files online Police complaint) दाखल केली आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक(Minister Nawab Malik) यांनी ट्विट केलेल्या काही Whats App चॅट्सच्या स्क्रीनशॉटवरून क्रांती यांनी मुंबई पोलिसांकडे ही तक्रार दाखल केली आहे.

  • Kranti Redkar Wankhede, wife of NCB Mumbai Zonal Director Sameer Wankhede files an online Police complaint with Mumbai Police, over the screenshots of some WhatsApp chats tweeted by Maharashtra Minister Nawab Malik. pic.twitter.com/1e5sDbcoQK

    — ANI (@ANI) November 23, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • तक्रारीत क्रांती रेडकरने काय म्हटले आहे?

एका ट्विटर हँडलने माझे खोटे हँडल तयार केले आहे. तसेच बनावट चॅट तयार केले आहेत. त्या हँडलसाठी प्रोफाईल फोटो म्हणून माझा फोटोही वापरला आहे. या बनावट चॅटचा स्क्रीनशॉट नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे, असे क्रांती रेडकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.

  • नवाब मलिक यांचे नवे ट्विट -

क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. नवाब मलिक दररोज समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. दरम्यान, आता नवाब मलिक यांनी आज पुन्हा एक ट्विट करून समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्यावर निशाणा साधला आहे.

नवाब मलिक यांनी क्रांती रेडकर यांचे एक चॅट ट्विट करत शेअर केले आहे. या चॅटमध्ये कॅप्टन जॅक स्पॅरो नावाची एक व्यक्ती क्रांती रेडकर यांना नवाब मलिक आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद यांच्यातील संबंधांचे पुरावे देण्याबद्दल बोलत आहे. त्यावर, हे पुरावे पाठवल्यास तुला बक्षीस दिले जाईल, असा रिप्लाय क्रांती रेडकर यांनी दिल्याचे दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी हे चॅट ट्विट करत 'ओह... माय गॉड' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Last Updated : Nov 23, 2021, 4:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.