ETV Bharat / city

आयाराम राजहंस सिंह (rajhans singh) यांना भाजपतर्फे विधान परिषदेची उमेदवारी, जाणून घ्या कोण आहेत...?

author img

By

Published : Nov 20, 2021, 3:24 PM IST

स्थानिक प्राधिकारी मतदार संघातील विधान परिषदेवर निवडून (mlc election) द्यायच्या 6 जागांसाठी येत्या 10 डिसेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने मुंबई स्थानिक प्राधिकारी मतदार संघातून माजी आमदार व काँग्रेस पक्षातून अलीकडेच पक्षात दाखल झालेले राजहंस सिंह (rajhans singh) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

rajhans singh
राजहंस सिंह

मुंबई - स्थानिक प्राधिकारी मतदार संघातील विधान परिषदेवर निवडून (mlc election) द्यायच्या 6 जागांसाठी येत्या 10 डिसेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने (mumbai) मुंबई स्थानिक प्राधिकारी मतदार संघातून माजी आमदार व काँग्रेस (congress) पक्षातून अलीकडेच पक्षात दाखल झालेले राजहंस सिंह (rajhans singh) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी येत्या 10 डिसेंबरला निवडणूक होत आहे. या विधान परिषदेच्या सहा जागांमध्ये मुंबईतील दोन जागांचा समावेश आहे. मुंबई महापालिकेतील संख्याबळ लक्षात घेऊन भाजपने मुंबईतून राजहंस सिंह यांना उमेदवारी (BJP Candidates for Maharashtra Legislative Council Election) दिली आहे.

मुंबईमधून अनेक नावे चर्चेत

मुंबईमधून या जागेसाठी अनेक इच्छुकांची नावे चर्चेत होती. भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ (chitra wagh), कृपाशंकर सिंह यांच्यासह 10 ते 12 जणांची नावे प्राथमिक यादीत होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या चित्रा वाघ यांना नुकतीच राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आल्याने विधान परिषदेची उमेदवारी दिल्यास पक्षातील नेत्यांची नाराजी वाढण्याची भीती असल्याने त्यांचा पत्ता कट करण्यात आला. दुसरीकडे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजहंस सिंह की कृपाशंकर सिंह याबाबत वरिष्ठ स्तरावर विचारविनिमय होऊन शेवटी राजहंस सिंह यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले.

राजहंस सिंह यांचा राजकीय प्रवास

राजहंस सिंह हे 40 वर्षे काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसमध्ये असताना राजहंस सिंह 1992 ते 1997 नगरसेवक होते. त्यानंतर पुन्हा 2002 ते 2012 अशी सलग दहा वर्षे ते नगरसेवक होते. काँग्रेसमध्ये असताना महापालिकेत 8 वर्ष विरोधी पक्ष नेतेही होते. 2009 मध्ये ते विधानसभेवर निवडून आले. 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षात प्रवेश करून 5 वर्ष ही पूर्ण झाली नसलेल्या राजहंस सिंह यांना पक्षाने आमदारकी दिली याबाबत पक्षांतर्गत धुसफूस सुरू झाली आहे.

हे ही वाचा - शेतकरी खलिस्तानवादी अतिरेकी होते, तर मग मोदींनी त्यांच्यापुढे पांढरे निशाण का फडकविले? - सामना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.