ंबई - आज सात फेब्रुवारी 'रोझ डे' ( Rose day on 7th Feb 2022 ) म्हणून साजरा केला जातो. याच 'रोझ डे' च्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत गुलाबाच्या दुनियेत... गुलाबाची ही दुनिया आहे दादर वेस्टला फुल मार्केटमध्ये! या फुल मार्केटमध्ये आज वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब पाहायला मिळत आहेत. चला तर जाणून घेऊया याच फुलांच्या प्रकारांविषयी...
- लाल गुलाब ( Red rose use ) - या रंगाचे गुलाब लग्न कार्य व कॉलेज कपलमध्ये अधिक मागणी असते. कारण, या रंगाचे गुलाब हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. हे गुलाब साधारण तीनशे ते साडेतीनशे रुपये किलो या दराने मिळते.
- पिवळे गुलाब ( Yellow rose use ) - या रंगाचे गुलाब मैत्रीचे प्रतीक मानले जाते. तुम्ही जर तुमच्या जिवलग मित्राशी भांडला असाल तर त्याला या रंगाचे गुलाब द्या. तुमच्या भावना व्यक्त करा.
या सोबतच आपल्या सदिच्छा व्यक्त करण्यासाठीदेखील या रंगाचे गुलाब दिले जाते. तुमच्या प्रियजनांपैकी कोण आजारी असेल तर त्यांना या रंगाचे गुलाब द्या. तुमच्या भावना व्यक्त करा. या रंगाचे गुलाब साधारण तीनशे ते चारशे रुपये किलो प्रमाणे मिळते. - पांढरा गुलाब ( White rose use ) - पांढरा रंग हा शुद्धतेच आणि शांतीचे प्रतीक आहे. सोबतच तो निर्दोष आणि कोमलपणाचे देखील प्रतीक आहे. जेव्हा तुम्हाला तुमच्या एखाद्या चुकीबद्दल माफी मागायची असेल तर तुम्ही या रंगाचे गुलाब देऊ शकता. या रंगाच्या गुलाबाची किंमत महाग असल्याचे बोलले जाते. हे गुलाब चारशे ते सहाशे रुपये किलो दराने मिळते.
हेही वाचा-Nitesh Rane in Kolhapur : वैद्यकीय तपासणीसाठी नितेश राणे कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल
- केशरी गुलाब ( Saffron rose use ) - या रंगाचं गुलाब उर्जेचे प्रतीक मानले जाते. जेव्हा तुम्हाला एखाद्याला प्रोत्साहन द्यायचे असेल, शुभेच्छा द्यायच्या असतील तर या रंगाच्या गुलाबाचा नक्की वापर करा. या रंगाचे गुलाब साधारण तीनशे ते चारशे रुपये किलो प्रमाणे मिळते.
पुण्याला गुलाबाची शेती ( Flowers farming in Pune ) -
दुकानातील विविध प्रकारच्या गुलाबाची माहिती देताना सोएक्स फार्मचे मुस्तफा म्हणाले की, "आता सध्या फुलांचा सिझन सुरू झाला आहे. अनेक कपल आमच्या दुकानातून फुले नेतात. सोबत लग्नाचादेखील सिझन असल्याने अनेक मंडप डेकोरेशनवाले आमच्याकडून होलसेलमध्ये फुल घेऊन जातात. आमची पुण्याला गुलाबाची शेती आहे. ही सर्व फुले आमच्याच शेतातून येतात. त्यामुळे आम्ही आमच्या ग्राहकांना उत्तम दर्जाचा व योग्य किंमतीचा माल देतो."
हेही वाचा-Shah Rukh Khan : शाहरुखने लता दीदींच्या पार्थिवासमोर मागितली दुआ, तर्कवितर्कांना उधाण