ETV Bharat / city

Kirit Somaiya Vs Sanjay Raut : संजय राऊत परिवाराच्या उद्योगधंद्यांबाबत एफआयआर दाखल करणार- किरीट सोमय्या - प्रवीण राऊत पत्नी व संजय राऊत पत्नी कन्स्ट्रक्शन कंपनी

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली ( Kirit Somaiya Vs Sanjay Raut ) आहे. राऊत परिवाराच्या घोटाळ्याबाबत उद्या पुण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी ( Kirit Somaiya Going To File FIR Against Sanjay Raut Family ) सांगितले.

किरीट सोमय्या
किरीट सोमय्या
author img

By

Published : Feb 4, 2022, 4:33 PM IST

मुंबई - भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना खासदार नेते संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला ( Kirit Somaiya Vs Sanjay Raut ) आहे. वाइनरीमध्ये संजय राऊत यांच्या परिवाराची पार्टनरशिप ( Sanjay Raut Family Winary Partmentship ), त्याचबरोबर प्रवीण राऊत यांच्या पत्नी व संजय राऊत यांच्या पत्नीची कन्स्ट्रक्शन कंपनी ( Pravin Raut Wife Connection With Sanjay Raut Wife ) असून, हे सर्व घोटाळे उघडकीस आणणार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले. त्याचबरोबर यासंदर्भात उद्या पुण्यात शिवाजीनगर येथे एफआयआर दाखल करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी ( Kirit Somaiya Going To File FIR Against Sanjay Raut Family ) सांगितले.

कोणा कोणाला काय काय मिळालं?

संजय राऊत काय-काय उद्योग करतात हे जनतेसमोर यायला सुरुवात झाली आहे. प्रवीण राऊत यांनी पैसे ढापले. १ हजार ९७ कोटी पीएमसी बॅंकेचे पैसे प्रवीण राऊत यांनी ढापले ( PMC Bank Fraud ) असे सांगत प्रवीण राऊतची पत्नी माधुरी राऊत आणि वर्षा राऊत यांची पार्टनरशीप असलेली कन्सस्ट्रक्शन कंपनी असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. माधुरी राऊतसोबतच का पार्टनरशीप केली? आपली पत्नी शिक्षिका आहे मग आतली गोष्ट काय आहे? असा प्रश्नही सोमय्या यांनी उपस्थित केला. कोणा कोणाला काय काय मिळालं? अलिबागची जागा मिळाली की दादरचा फ्लॅट मिळाला? प्रवीण राऊत आणि कंपनी आपल्याला कशी मदत करते हे लोकांना कळू द्या असेही सोमय्या म्हणाले.

आपले उद्योगधंदे लोकांना उद्यापर्यंत सांगा, अन्यथा मी सांगेन!

विदिता संजय राऊत, पूर्वशी संजय राऊत, सुजित मुकुंद पाटकर कोण आहेत? २०१० मध्ये प्रवीण राऊत याने त्यांना मदत केली. २०१० मध्ये अलिबागमधली जागा घेतली. त्यातले ५५ लाख रुपये ईडीला परत केले. सुजित पाटकर आणि राऊतांचा संबंध काय? असे सांगत उद्या दुपारी ४ वाजता पुणे, शिवाजीनगर येथे राऊत परिवाराच्या उद्योगधंद्यांसंबधी एफआयआर दाखल करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे. त्याच बरोबर तुमचे उद्योगधंदे लोकांना उद्यापर्यंत सांगा अन्यथा मी सांगेन असा धमकीवजा इशाराही किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना दिला आहे.

मुख्यमंत्री अनिल परब यांचा राजीनामा कधी घेणार?

अनिल परब यांना लाज वाटली पाहिजे. मुख्यमंत्री काय करत आहात तुम्ही? आत्तापर्यंतचा एवढा खोटा मंत्री मी आतापर्यंत बघितला नाही. सोमय्या घोटाळा काढतात म्हणून २९ डिसेंबरला सदानंद गंगाराम कदम यांना जागा विकली. ही जागा त्यांनी ॲग्रीकल्चर लॅंड म्हणून विकली आहे. याबाबत आम्ही लोकायुक्तकडे तक्रार केली. १७ जून २०२१ ला पर्यावरण सचिवांना पत्र लिहिल. रत्नागिरीत जिल्हाधिकाऱ्यांनी रिपोर्ट पाठवला. सीआरझेड आहे, तरीही रिसाॅर्ट बांधला गेला आणि म्हणून रिसाॅर्ट पाडला. आता मुख्यमंत्री अनिल परब यांचा राजीनामा कधी घेणार? असा प्रश्नही किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.