ETV Bharat / city

Kirit Somaiya targets Ministers : किरीट सोमैय्या यांच्या निशाण्यावर पुन्हा मंत्री अनिल परबांसह हसन मुश्रीफ - Kirit Somaiya targets Ministers

मंत्री हसन मुश्रीफ ( Minister Hassan Mushrif invest ) यांनी शेल कंपन्यांमध्ये पैसा गुंतवला आहे. त्यांनी मोठा आर्थिक घोटाळा ( big financial scam ) केला आहे. न्यायालयाकडून या प्रकरणाच्या तपास करण्याचा आदेश दिला जाणार आहे. त्यांच्या कारनाम्यांवर आजपासून कारवाईला सुरुवात होणार असल्याचे सोमैय्या ( Kirit Somaiya on Hassan Mushrif ) यांनी म्हटले आहे.

किरीट सोमैय्या
किरीट सोमैय्या
author img

By

Published : Apr 1, 2022, 3:29 PM IST

मुंबई - महाविकास आघाडी सरकारमधील 12 मंत्र्यांसह नेते किरीट सोमैय्या यांच्या रडारवर आहेत. ते लवकरच तुरुंगात जातील असे किरीट सोमैय्या वारंवार सांगत आलेले आहेत. या अगोदर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड, राष्ट्रवादीचे मंत्री माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. तर आता माजी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. यानंतर आता परिवहन मंत्री अनिल परब व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर लवकर कारवाई होणार असल्याचे किरीट सोमैय्या यांनी सांगितले आहे.

शेल कंपन्यांत आर्थिक घोटाळा! - मंत्री हसन मुश्रीफ ( Minister Hassan Mushrif invest ) यांनी शेल कंपन्यांमध्ये पैसा गुंतवला आहे. त्यांनी मोठा आर्थिक घोटाळा ( big financial scam ) केला आहे. न्यायालयाकडून या प्रकरणाच्या तपास करण्याचा आदेश दिला जाणार आहे. त्यांच्या कारनाम्यांवर आजपासून कारवाईला सुरुवात होणार असल्याचे सोमैय्या ( Kirit Somaiya on Hassan Mushrif ) यांनी म्हटले आहे. यासंदर्भात न्यायालयामध्ये सरकारने याचिका दाखल केल्याचाही दावाही सोमैय्यांनी केला आहे. मुश्रीफ आणि परब यांनी केलेल्या घोटाळ्यांसंदर्भात आपण भारत सरकारकडे तक्रार केल्याचेही सोमैय्या यांनी म्हटले आहे. तसेच केंद्र सरकारने ही तक्रार स्वीकारली आहे. आजपासून यासंदर्भात घडामोडी सुरू होतील, असे वक्तव्य सोमैय्या यांनी केले आहे. हा एकूण १५८ कोटींचा घोटाळा आहे. यामध्ये ईडी, कंपनी मंत्रालय, प्राप्तीकर विभागाकडून कारवाई केली जाईल, अशी शक्यताही सोमैय्यांनी व्यक्त केली.

किरीट सोमैय्या यांचे ट्विट
किरीट सोमैय्या यांचे ट्विट
अनिल परब यांचा दावा खोटा! -अनिल परबांवर निशाणा साधताना सोमैय्या म्हणाले, की ते मागील सहा महिन्यापासून रोज बोलतात की माझा रिसाॅर्टशी संबंध नाही. परबांवर मोदी सरकारनेच याचिका दाखल केलीये. तुम्ही या याचिकेत गुन्हेगार आहात. केंद्र सरकारची याचिका आहे, न्यायालयाने दखल घेतली असून १६ एप्रिलला सुनावणी आहे. परब यांनी खरमाटे आणि सचिन वाझेंकडून पैसे घेऊन रिसाॅर्ट बांधला. कोव्हीडच्या नावाखाली लाॅकडाऊन करत घोटाळा केला. परब, बॅग भरा तयारी करा, असेही सोमैय्या म्हणाले आहेत. किरीट सोमैय्या यांच्या दाव्यात कुठलेही तथ्य नसल्याचे याअगोदरसुद्धा मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे. परंतु आता चौकशीला सामोरे जाताना त्यातून काय निष्पन्न होते हे बघावे लागणार आहे.

हेही वाचा- Nana Patole Criticized Kirit Somaiya : नारायण राणे, कृपाशंकर सिंहांवरील सोमैयांच्या आरोपांचे काय झाले?; नाना पटोलेंचा सवाल

हेही वाचा-Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचे किरीट सोमैयांना प्रत्युत्तर; म्हणाले, बेकायदेशीर वास्तूंवर कारवाई करण्यासाठी...

हेही वाचा - Ajit Pawar Warns ST worker : हजर व्हा! नाहीतर नवीन भरती करू; उपमुख्यमंत्र्यांचा एसटी कामगारांना इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.