मुंबई- भाजपचे नेते किरीट सोमैय्या यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर खोचक टीका केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey ) यांंचे निकटवर्तीय असलेले मुबंईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची आज ईडी कार्यालयात चौकशी ( ED office in Delhi ) होणार आहे. त्यावरून किरीट सोमैय्या यांनी संजय पांडे हाजीर हो, असे ट्विट केले आहे. संजय पांडे यांना ईडीने समन्स बजाविले होते. 30 जून रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन संजय पांडे निवृत्त झाले होते. त्यानंतर अवघ्या 3 दिवसांच्या आत त्यांना ईडीने नोटीस पाठविली होती.
किरीट सोमैय्या यांनी ट्विट करत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे, संजय पांडे हाजीर हो.. बेकायदेशीर फोन टॅपिंग 118 व्यक्तींचा घोटाळा..किरीट सोमैय्यांनी ट्विटमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ईडी संचालक व भाजपलाही टॅग केले आहे.
-
#SanjayPandey Hajir Ho #NSE Illegal phone tapping of 118 persons scam @dir_ed asked #MVA Govt Police Commissioner Sanjay Pandey to present today at Delhi office
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Earlier he was summoned for #Colocation Scam @BJP4India @Dev_Fadnavis
">#SanjayPandey Hajir Ho #NSE Illegal phone tapping of 118 persons scam @dir_ed asked #MVA Govt Police Commissioner Sanjay Pandey to present today at Delhi office
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 15, 2022
Earlier he was summoned for #Colocation Scam @BJP4India @Dev_Fadnavis#SanjayPandey Hajir Ho #NSE Illegal phone tapping of 118 persons scam @dir_ed asked #MVA Govt Police Commissioner Sanjay Pandey to present today at Delhi office
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 15, 2022
Earlier he was summoned for #Colocation Scam @BJP4India @Dev_Fadnavis
किरीट सोमैय्यांनी दुसरे ट्विट करत या घोटाळ्याचा २०१७ पासून पाठपुरावा करत असल्याचे म्हटले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी पाठपुरावा करणारे पत्रही जोडले आहे.
-
I am pursuing @NSEIndia #Colocation Scam since 2016/2017.
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
First Whistle Blower raised the issue, subsequently Journalist, Activists pursued for investigation of the Fraud.
at last ACTIONS started @BJP4India pic.twitter.com/pJDcUmz68I
">I am pursuing @NSEIndia #Colocation Scam since 2016/2017.
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 15, 2022
First Whistle Blower raised the issue, subsequently Journalist, Activists pursued for investigation of the Fraud.
at last ACTIONS started @BJP4India pic.twitter.com/pJDcUmz68II am pursuing @NSEIndia #Colocation Scam since 2016/2017.
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 15, 2022
First Whistle Blower raised the issue, subsequently Journalist, Activists pursued for investigation of the Fraud.
at last ACTIONS started @BJP4India pic.twitter.com/pJDcUmz68I
ईडीकडून संजय पांडे यांना नोटीस-संजय पांडे ज्यावेळी पोलीस महासंचालक होते तेव्हा त्यांनी परमबीर सिंह ( Parambir Singh ) यांना अनिल देशमुख यांच्याविरोधात माघार घेण्यासाठी दबाव निर्माण केला होता. तसेच एनएसई सर्वर कंप्रमाइज केस प्रकरणात त्यांना समन्स बजावण्यात ( NSE server compromise case ) आले होते. चित्रा रामकृष्णा प्रकरणात एक ऑडिट कंपनी तयार करण्यात आली होती. ही कंपनी संजय पांडे यांची होती. या दोन्ही प्रकरणी संजय पांडे यांना ईडीने नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकणात संजय पांडे यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे.
नुकतेच पदावरून निवृत्त- संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर ते राज्याचे पोलीस महासंचालक देखील होते. पण काही तांत्रिक आणि कायदेशीरबाबींमुळे त्यांची पोलीस महासंचालक पदावरुन मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. ते नुकतेच तीन दिवसांपूर्वी 30 जूनला मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन निवृत्त झाले आहेत. त्यानंतर त्यांना ईडीने नोटीस पाठवल्याची बातमी समोर आली आहे.
काय आहे प्रकरण- संजय पांडे यांनी पोलीस सेवेतून निवृत्त होण्यासाठी राजीनामा दिला होता. ईडीने नॅशनल स्टॉक एक्सचेंज प्रकरणी समन्स बजाविले आहे. एनएसई सह-स्थान घोटाळ्यात 2018 मध्ये नोंदवलेल्या सीबीआयच्या खटल्याच्या आधारे ईडी तपास करत आहे. त्यानंतर त्यांनी 2001 मध्ये स्वत:चे आयटी ऑडिट फर्म सुरू केले होते. या दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नव्हता. त्यामुळे त्यांना पुन्हा सेवेत हजर राहावे लागले. त्यावेळी संजय पांडे यांनी आपली आई आणि मुलाला फर्मचं संचालक केलं होतं. या फर्मचं Isec Services Pvt Ltd असं नाव होतं. या फर्मला NSE सर्व्हर आणि सिस्टम्सचे IT ऑडिट कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. त्यावेळी फर्मने दिलेल्या अहवालात कोणतंही उल्लंघन झालेलं नाही, असा उल्लेख करण्यात आला होता. त्यावरुन CBI ने फर्मची चौकशी सुरु केली होती. या प्रकरणी आता ईडीदेखील चौकशी करत आहे.
हेही वाचा-मुंंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची दिल्लीतील ईडी कार्यालयात चौकशी
हेही वाचा-माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या विरोधात सीबीआयकडून तीन गुन्हे दाखल, 16 ठिकाणी छापेमारी