मुंबई- भाजप नेते किरीट सोमैय्या हे सातत्याने शिवसेनेच्या नेत्यांवर टीका करतात. त्यांनी अनेक प्रकरणे लावून धरल्यानंतर अनेक नेत्यांच्या ईडीकडून चौकशीदेखील झाल्या आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना मंगळवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्यावरून किरीट सोमैय्या यांनी संजय राऊत ( kirit somaiya slammed Sanjay Raut ) यांना इशारा दिला आहे.
भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. अब संजय राऊत की बारी आहे. विशेष म्हणजे त्यांनी माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक केल्यानंतर हे ट्विट केले आहे. त्यावरून त्यांना संजय राऊत यांना अटक होणार असे आहे, असे सूचवायचे आहे.
एनएसई कोलोकेशन आणि फोन टॅपिंग घोटाळ्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अटकेचे किरीट सोमैय्या यांनी स्वागत केले आहे. मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या माफियाराजासाठी पोलीस दलाचा गैरवापर केल्याचेही सोमैय्या यांनी म्हटले आहे.
-
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Ab #SanjayRaut ki Bari Hai
_ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
अब संजय राऊत की बारी है @BJP4India @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil
">_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 20, 2022
Ab #SanjayRaut ki Bari Hai
_ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
अब संजय राऊत की बारी है @BJP4India @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 20, 2022
Ab #SanjayRaut ki Bari Hai
_ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
अब संजय राऊत की बारी है @BJP4India @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil
संजय राऊत यांची आज ईडीकडून चौकशी-शिवसेना खासदार संजय राऊत यांना पुन्हा ईडीकडून समन्स ( ED probe of Sanjay Raut ) बजावण्यात आले आहे. पत्रा चाळ प्रकरणात संजय राऊत यांना पुन्हा ईडीकडून समन्स पाठवण्यात आले आहे. यापूर्वी देखील संजय राऊत यांची आठ तास चौकशी करण्यात आली होती. संजय राऊत यांना आज ( 20 जुलै ) चौकशीला हजर राहण्याचे निर्देश ईडीने समन्समधून देण्यात आले आहे. शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांना पुन्हा ईडीने चौकशीकरिता बुधवारी (20 जुलै) मुंबईतील ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावलं आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ कथित घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावले आहे. यापूर्वी 7 जुलै रोजी 10 तास संजय राऊत यांची चौकशी करण्यात आली होती.
-
#SanjayPandey arrested by ED today
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
& #SanjayRaut summoned by @dir_ed tomorrow @BJP4India @narendramodi @Dev_Fadnavis
">#SanjayPandey arrested by ED today
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 19, 2022
& #SanjayRaut summoned by @dir_ed tomorrow @BJP4India @narendramodi @Dev_Fadnavis#SanjayPandey arrested by ED today
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 19, 2022
& #SanjayRaut summoned by @dir_ed tomorrow @BJP4India @narendramodi @Dev_Fadnavis
संजय राऊतांचे निकटवर्तीयांची चौकशी - संजय राऊत यांना ईडीच्या मुंबई कार्यालयाकडून मंगळवारी समन्स बजावण्यात आले आहे. बुधवारी 20 जुलै रोजी त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी त्यांना हे समन्स बजावण्यात आले आहे. यापूर्वी दोन वेळा राऊतांची चौकशी झाली आहे. याच प्रकरणी ईडीने आज संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर आणि स्वप्ना पाटकर यांची सुमारे सहा तास चौकशी करण्यात आली, त्यानंतर त्यांना सोडण्यात आले. पण आता राऊतांना नोटीस बजावली असून उद्या त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
काय आहे संजय पांडे यांचे प्रकरण- संजय पांडे यांनी पोलीस सेवेतून निवृत्त होण्यासाठी राजीनामा दिला होता. ईडीने नॅशनल स्टॉक एक्सचेंज प्रकरणी समन्स बजाविले आहे. एनएसई सह-स्थान घोटाळ्यात 2018 मध्ये नोंदवलेल्या सीबीआयच्या खटल्याच्या आधारे ईडी तपास करत आहे. त्यानंतर त्यांनी 2001 मध्ये स्वत:चे आयटी ऑडिट फर्म सुरू केले होते. या दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नव्हता. त्यामुळे त्यांना पुन्हा सेवेत हजर राहावे लागले. त्यावेळी संजय पांडे यांनी आपली आई आणि मुलाला फर्मचं संचालक केलं होतं. या फर्मचं Isec Services Pvt Ltd असं नाव होतं. या फर्मला NSE सर्व्हर आणि सिस्टम्सचे IT ऑडिट कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. त्यावेळी फर्मने दिलेल्या अहवालात कोणतंही उल्लंघन झालेलं नाही, असा उल्लेख करण्यात आला होता. त्यावरुन CBI ने फर्मची चौकशी सुरु केली होती. या प्रकरणी आता ईडीदेखील चौकशी करत आहे.
हेही वाचा-Kirit Somaiya on Aarey : कारशेडचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी झाडे तोडण्याची गरज नाही- किरीट सोमैय्या