मुंबई - विक्रांत निधी संकलनातील ( INS Vikrant Case ) गुन्हेगार किरीट सोमैयांना राजभवन संरक्षण देत आहे का?. गुन्हेगार राजभवनावर जाऊन राज्यपालांची ( Kirit Somaiya Meet Bhagat Singh Koshyari ) भेट कशी घेतात, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला ( Sanjay Raut On Bhagatsingh Koshyari ) आहे. तसेच, राणा दाम्पत्याने कुठेही पत्र द्यावे, कशाला घाबरत नाही. दिल्लीमध्ये तक्रार दिल्यावरुन त्यांची मानसिकत लक्षात येते, असेही राऊतांनी ( Sanjay Raut On Rana Couple ) म्हटले आहे.
भाजपला हवेत गोळीबार करण्याची सवय - संजय राऊत म्हणाले की, नवनीत राणा आणि रवी राणांच्या आर्थिक संबंधाची चौकशी व्हावी, याबाबत मागणी केली आहे. मी कोणाच्याही व्यक्तिगत फोटोबाबत चर्चा केलेली नाही. कोण कोणासोबत जेवायला बसले, कोणी कोणाची सुपारी घेतली याबाबत काहीही बोललेलो नाही. भाजपला हवेत गोळीबार करण्याची सवय आहे, त्यांना ते करू द्या. त्यांच्या गोळीने काही फरक पडत नाही. पण, मी आर्थिक व्यवहार झाल्याची चौकशी व्हायला हवी असे म्हणालो, यात गैर काय आहे, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे.
गुन्हेगार राज्यपालांना कसे भेटतात? - भाजपचे नेते किरीट सोमैयांनी आज ( 27 एप्रिल ) राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेत बनावट एफआयआर बाबत तक्रार ( Kirit Somaiya Meet Bhagat Singh Koshyari ) केली. याविषयी विचारले असता राऊत यांनी म्हटले की, त्यांना राज्यपाल राष्ट्रपतींनाही भेटू द्या. मात्र, राज्यपाल गुन्हेगारांना कसे भेटू शकतात हा खरा प्रश्न आहे. विक्रांत घोटाळ्यातील निधी ( INS Vikrant Case ) जो राज्यपालांकडे सोपवला आहे, असे सांगितले जाते. या प्रकरणामध्ये त्यांना जामीन मिळाला आहे. या प्रकरणातील आरोपी राजरोसपणे जाऊन राजभवनावर भेट घेत असेल, तर राजभवनाचे गुन्हेगारांना संरक्षण आहे का?, असा प्रश्नही राऊतांनी राजभवनाला विचारला आहे.
जिथे तक्रार करायची करु द्या - महाराष्ट्रात पोलीस असताना राणा दाम्पत्याने दिल्लीत तक्रार करण्याचे कारण काय?. यावरून त्यांची मानसिकता लक्षात येते. त्यांना जिथे तक्रार करायची आहे तिथे करु द्या, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.