ETV Bharat / city

Kirit Somaiya Bail Rejected : किरीट सोमैयांच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला - Court Rajected Anticipatory Bail Kirit Somaiya

युद्धनौका आयएनएस विक्रांतसाठी ( INS Vikrant Case ) गोळा केलेल्या मदतनिधी प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात ( Mumbai Session Court ) सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने किरीट सोमैयांचा जामीन अर्ज फेटाळला ( Kirit Somaiya Bail Rejected )आहे.

kirit somaiya
kirit somaiya
author img

By

Published : Apr 11, 2022, 3:39 PM IST

Updated : Apr 11, 2022, 5:26 PM IST

मुंबई - युद्धनौका आयएनएस विक्रांतसाठी ( INS Vikrant Case ) गोळा केलेल्या मदतनिधीत झालेल्या कथित घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबत अटक टाळण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमैयांनी ( Bjp Leader Kirit Somaiya ) याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी ( Mumbai Session Court ) पार पडली. त्यानंतर आता भाजपा नेते किरीट सोमैया आणि नील सोमैया यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला ( Kirit Somaiya Bail Rejected ) आहे.

सुनावणी दरम्यान किरीट सोमैयांचे वकिल अशोक मूंदरगी यांनी न्यायालयात सांगितले की, आम्ही निधी जमा करायला राज्यपाल भवनात गेलो. त्यांनी म्हटले की, अशाप्रकारे निधी जमा करणारी कोणतीही तरतूद नाही. त्यानंतर आम्ही सर्व रक्कम पक्षाकडे जमा केली.

सरकारी वकील प्रदीप घरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

त्यावर युक्तीवाद करताना सरकारी वकील प्रदीप घरात म्हणाले, आम्हाला या प्रकरणात आरोपींची चौकशी करण्याकरिता कोठडी आवश्यक आहे. आयएनएस विक्रांत वाचवण्यसाठी ज्या कोणी लोकांनी पैसे गोळा केले आहेत. त्या सर्वांची चौकशी करण्यात येणार आहे. किरीट सोमैयांनी पक्षाला निधी जमा केला असेल तर, त्याची देखील चौकशी करण्यात येईल.

हेही वाचा - Rajnath Singh on US Visit : भारत-अमेरिका 2+2 संवाद! राजनाथ सिंह यांनी घेतली प्रमुख अधिकाऱ्यांची भेट

Last Updated : Apr 11, 2022, 5:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.