ETV Bharat / city

Sanjay Raut Allegation on Kirit Somaiya : राकेश वाधवानचा किरीट सोमैयांशी आर्थिक संबंध; राऊतांचा आरोप - संजय राऊत राकेश वाधवान आरोप

शिवसेना नेते संजय राऊत ( MP Sanjay Raut Press) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन थेट भाजप नेते किरीट सोमैया (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नगरसेवक निल सोमैया (Neil Somaiya) यांच्यावर कडाडून टीका केली. पीएमसी बँक घोटाळ्याच्या मास्टरमाईडशी सोमैया यांचे संबंध आहेत, असे राऊत म्हणाले.

sanjay raut
शिवसेना खासदार संजय राऊत
author img

By

Published : Feb 15, 2022, 5:41 PM IST

Updated : Feb 15, 2022, 6:35 PM IST

मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत ( MP Sanjay Raut Press) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन थेट भाजप नेते किरीट सोमैया (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नगरसेवक निल सोमैया (Neil Somaiya) यांच्यावर कडाडून टीका केली. पीएमसी बँक घोटाळ्याच्या मास्टरमाईड राकेश वाधवानशी सोमैया यांचे संबंध आहेत. सोमैयांचा मुलगा तर या मास्टरमाईडच्या कंपनीत डायरेक्टर आहे. त्यांनी निकॉन फेज वन आणि टू असे प्रकल्प उभे केले आहेत. त्यांना पर्यावरणाच्या परवानग्या नाहीत. आदित्य ठाकरेंना (aaditya thackeray) माझे आवाहन आहे की याची ताबडतोब चौकशी करून निल सोमैया आणि किरीट सोमैया यांना अटक करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तसेच पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाईंडच्या अकाऊंटमधून भाजपला 20 कोटींचा निधी गेला असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांची पत्रकार परिषद
  • संजय राऊत यांनी केले गंभीर आरोप -

खासदार संजय राऊत म्हणाले की, पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी राकेश वाधवान याला ब्लॅकमेल केले आणि त्याच्याकडून कोट्यवधीची जमीन घेतली. त्यांनी एक जमीन सात कोटी रुपयांना आणि वसई येथील 400 कोटी रुपयांची जमीन चार कोटी रुपयाला घेतली आहे. त्या जमिनीवर कंपनी आहे त्या कंपनीचा डायरेक्टर नील किरीट सोमैया आहे. निकॉन फेज वन आणि निकॉन फेज दोन हे हजारो कोटींचे प्रकल्प उभारले आहेत. त्याला पर्यावरण क्लिअरन्स नाही. या प्रकरणी कंपनीच्या सर्व परवानग्या रद्द करा.

  • किरीट सोमैया दलाल असल्याचा आरोप

खासदार संजय राऊत भाजप नेते किरीट सोमैयांविषयी बोलताना म्हणाले की, छत्रपतींच्या या राज्यामध्ये या आधी असे घाणेरडे राजकारण केले नाही. उद्धव ठाकरे आणि परिवाराच्या रोज बातम्या उठवायच्या. पण या बातम्या जो सांगतो तो दलाल आहे. किरीट सोमैया हा माणूस मराठी द्वेषी आहे. त्यानेच मुंबईतील शाळांमध्ये मराठी सक्ती केल्यानंतर कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. आधी त्याचे थोबाड बंद करा. मराठीचा द्वेष करणाऱ्या या माणसाकडून अजून काय अपेक्षा करणार? तसेच किरीट सोमैया हे भाजपचे फ्रंटमॅन आहेत

  • मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी -

पीएमसी घोटाळ्यातील आरोपीने सोमैयांच्या जवळच्या माणसाला का जमीन विकली? हा भ्रष्टाचाराविरोधात लढणारा माणूस आम्हाला ज्ञान देतोय, आम्हाला अक्कल शिकवतोय. एकीकडे भ्रष्टाचारविरोधाची भजने करायची आणि दुसरीकडे भ्रष्टाचार करायचा. देवेंद्र लधानी हा सोमैयांचा फ्रंटमॅन आहे.. त्यांच्या नावे व्यवहार केले जात आहेत. याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Last Updated : Feb 15, 2022, 6:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.