ETV Bharat / city

Kirit Somaiya on anil parab : अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा, किरीट सोमैया यांची मागणी

दापोलीतील रिसॉर्ट ( Dapoli resort ) प्रकरणी परिवहन मंत्री अनिल परब ( Anil Parab resort CBI inquiry demand ) यांच्या घरावर धाड टाकण्यात आली होती. आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच भाजप नेते किरीट सोमैया ( kirit somaiya ) यांनी आता अनिल परब यांच्या दापोली ( Kirit Somaiya on anil parab ) रिसॉर्ट घोटाळ्याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

Kirit Somaiya demands CBI probe of Anil Parab
किरीट सोमैया
author img

By

Published : May 29, 2022, 11:27 AM IST

मुंबई - दापोलीतील रिसॉर्ट ( Dapoli resort ) प्रकरणी परिवहन मंत्री अनिल परब ( Anil Parab resort CBI inquiry demand ) यांच्या घरावर धाड टाकण्यात आली होती. आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच भाजप नेते किरीट सोमैया ( kirit somaiya ) यांनी आता अनिल परब यांच्या दापोली ( Kirit Somaiya on anil parab ) रिसॉर्ट घोटाळ्याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. एकूण सात एजन्सींना पक्षकार केल्याची माहिती सोमैयांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

माहिती देताना भाजप नेते किरीट सोमैया

हेही वाचा - Sambhaji Raje : संधी, साळसूदपणाचा आव आणि धोका.. भाजपनेच केला संभाजी राजेंचा 'राजकीय गेम'?

दापोली येथील मुरुड गावच्या सागरी किनाऱ्या जवळील शेत जमिनीच्या जागेवर साई रिसॉर्ट बांधण्यात आला आहे. कोविड काळात रिसॉर्टचे बांधकाम करण्यात आले असून सीआरझेड नियमांचे उल्लंघन झाले आहे. या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमैयांनी तक्रार केली होती. ईडीने नुकतेच अनिल परब यांच्याशी निगडीत सात ठिकाणी धाडी टाकल्या. दरम्यान, संबंधित रिसॉर्टशी माझा संबंध नसल्याचे अनिल परब यांनी स्पष्ट केले होते. मात्र, भाजप नेते किरीट सोमैया यांनी संबंधित रिसॉर्ट अनिल परब यांचेच असल्याचा दावा केला. तसेच, पत्रकार परिषद घेऊन पुरावे सादर केले.

न्यायालयात धाव - अनिल परब यांची सीबीआय चौकशी करावी. त्यांनी शेतजमीन म्हणून घेतली आणि तेथे रिसॉर्ट बांधला. सरकारच्या अहवालातही असे नमूद केले आहे. हा मोठा फ्रॉड आहे. सरकार बनवाबनवी करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परब यांना मदत केली आहे. यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून दाद मागितली आहे. त्यात राज्य सरकार, केंद्र सरकार, आयकर विभाग, ईडी आदी तीन एजन्सींना पक्षकार केल्याचे सोमैयांनी सांगितले. तसेच हे माफिया सरकार असल्याचा आरोप केला. पर्यावरणाचा कांगावा कशाला? पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे एकीकडे पर्यावरण वाचवण्याचा सल्ला देतात, दुसरीकडे यांचेच मंत्री नियम पायदळी तुडवत आहेत. हा कांगावा कशाला? असा प्रश्न किरीट सोमैयांनी उपस्थित केला. परंतु, या सरकारवर आमचा विश्वास नाही. त्यामुळे, केंद्रीय तपास यंत्रणेकडे तक्रार केल्याचे सोमैया म्हणाले.

हेही वाचा - Vegetables Grains Rate Today : भाजीपाला, धान्याच्या दरांमध्ये आज वाढ की घसरण..? पाहा आजचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.