ETV Bharat / city

INS Vikrant Case Kirit Somaiya : यापूर्वी माझ्यावर १७ वेळा आरोप झाले, मी कोणाला घाबरत नाही - किरीट सोमैया - भाजपा नेते किरीट सोमैया विक्रांत प्रकरण

यापूर्वीही १७ वेळा माझ्यावर आरोप झाले पण काही निष्पन्न झाले नाही. मी कुणाला घाबरत नाही, तुम्ही हवी ती चौकशी करा, अशी प्रतिक्रिया सोमैया ( BJP leader Kirit Somaiya ) यांनी दिली आहे. मुंबईत त्यांच्या निवस्थानी ते बोलत होते.

संजय राऊत आणि किरीट सोमैया
संजय राऊत आणि किरीट सोमैया
author img

By

Published : Apr 6, 2022, 4:51 PM IST

Updated : Apr 6, 2022, 5:41 PM IST

मुंबई - आयएनएस विक्रांत प्रकरणी ( INS Vikrant case ) भाजपा नेते किरीट सोमैया ( BJP leader Kirit Somaiya ) यांच्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत ( Shiv Sena leader MP Sanjay Raut ) यांनी देशद्रोहाचा आरोप केला आहे. याचा समाचार घेताना किरीट सोमैया यांनी हे आरोप फेटाळून लावत यापूर्वीही १७ वेळा माझ्यावर आरोप झाले पण काही निष्पन्न झाले नाही. मी कुणाला घाबरत नाही, तुम्ही हवी ती चौकशी करा, अशी प्रतिक्रिया सोमैया ( BJP leader Kirit Somaiya ) यांनी दिली आहे. मुंबईत त्यांच्या निवस्थानी ते बोलत होते.

प्रतिक्रिया देताना किरीट सोमैया

'कितीही चौकशी करा' : आय एन एस विक्रांत प्रकरणी भाजपा नेते किरीट सोमैया यांच्यावर संजय राऊत यांनी आरोप केल्यानंतर सोमैया यांनी त्यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले आहे. यापूर्वीही १७ वेळा माझ्यावर आरोप करण्यात आले. पण काही निष्पन्न झाले नाही. ही १८ वी वेळ आहे. मी काही केले असेल तर त्याची चौकशी करावी. सर्व कागदपत्रे उध्दव ठाकरे यांना द्यावेत. ते चौकशी करतील मी कुणालाही घाबरत नाही. कारण मी काही खोटे केले नाही आहे. आता सुजित पाटकरवर सेशन कोर्टात व पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. कोविडमध्ये जंबो सेंटरचा महाघोटाळा समोर आल्याने यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर आता कारवाई होणार असल्याने ते घाबरले आहेत. पण मी विक्रांत प्रकरणी कुठल्याही चौकशीला तयार आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक, अनिल परब, संजय राऊत यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे, असेही सोमैया म्हणाले.

काय आहे आयएनएस विक्रांत प्रकरण? : 'आयएनएस विक्रांत' या युद्धनौकेने १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. सन १९६१ मध्ये नौदलात दाखल झालेल्या आयएनएस विक्रांतची देखभाल करण्यास महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच असमर्थता दर्शविली होती. आयएनएस विक्रांतचा लिलाव न करता या युद्धनौकेचे संग्रहालयात रूपांतर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. विक्रांत वाचवण्यासाठी सोमैया यांनी सामान्य नागरिकांपासून सर्वच स्तरातील व्यक्तींकडून निधी जमवला होता. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीतून ही बाब समोर आली असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले. हा देशद्रोहीपणा असून त्याचा तपास केंद्रीय संस्थांनी करावा, असे आव्हानही राऊत यांनी केले. सोमैया हे सीए असल्यामुळे असा पैसा कसा पचवायचे याची त्यांना माहिती असल्याचेही राऊत यांनी म्हटले. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी सोमैया यांनी लोकांकडून निधी जमवला होता. या दरम्यान 57 ते 58 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात होता. यात सोमैया यांच्यासह इतर भाजपा नेतेदेखील सहभागी होते. मात्र, या भ्रष्टाचाराच्या कटाचे प्रमुख सोमैया होते, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. सोमैया हे सीए असल्यामुळे या पैशांचे काय करायचे हे त्यांना ठाऊक असल्याचेही राऊत यांनी म्हटले.

हेही वाचा - Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट.. चर्चांना उधाण

Last Updated : Apr 6, 2022, 5:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.