मुंबई - राज्य सरकारने अथवा उद्धव ठाकरेंनी कोणत्याही यंत्रणेमार्फत माझी चौकशी करावी. मी कशालाही घाबरत नाही. माझ्या पत्नी आणि मुलांवर धादांत खोटे आरोप केले असल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमैया ( Kirit Somaiya comment on sanjay raut allegations ) यांनी केला आहे.
हेही वाचा - Shivsena Leader Sudhir Joshi : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे वृद्धापकाळाने निधन
ईओडब्ल्यूच्या माध्यमातून किरीट सोमैया यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नाना पटोले तसेच, संजय राऊत यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मी किंवा माझ्या कुटुंबीयांनी कोणत्याही प्रकारचा घोटाळा केलेला नाही. केवळ आरोप करण्यापेक्षा पुरावे द्या आणि माझ्यावर कारवाई करा, असे प्रतिआव्हान किरीट सोमैया यांनी यावेळी दिले.
कोलई गावात जाणारच - सोमैया
रश्मी उद्धव ठाकरे यांच्या नावाने असलेली जमीन आणि बंगले यांचे सत्य उघडकीस आणण्यासाठी आपण उद्या स्वतः कोलई गावात जाणार आहोत. मला विरोध करण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी, आपण जाऊन सत्य उघडकीस आणणारच, असेही सोमैया यांनी सांगितले.
सरपंच खोटे बोलत आहेत -
कोलई गावचे सरपंच मिसाळ यांनी आधी स्वतः रश्मी ठाकरे यांचे बंगले असल्याचे मान्य केले होते. मात्र, आता त्यांच्यावर दबाव आल्यानंतर ते खोटे बोलत आहेत, असा आरोपही सोमैया यांनी केला.
हेही वाचा - Keshav Upadhye : शिवसेनेकडे सत्ता असूनही हिंमत नाही - केशव उपाध्ये