ETV Bharat / city

'मुंडेंच्या 'पर्दाफाश'नंतर धमकीचे फोन, शरद पवारांनी समोर येऊन लढावे' - kirit somaiya on Dhannjay Munde resignation

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर महिलेने बलात्काराची पोलिसात तक्रार दाखल केली आहे. बलात्काराचा आरोप झाल्यानंतर विरोधी पक्षाने भाजप धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

संपादित
संपादित
author img

By

Published : Jan 15, 2021, 11:59 PM IST

मुंबई- सामाजिक व न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी करणारे भाजप नेते किरीट सोमैया यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांच्या पर्दाफाशनंतर सतत धमकीचे कॉल येत असल्याचा माजी खासदार सोमैय्या यांनी आरोप केला आहे.

भाजपचे नेते किरीट सौमेय्या म्हणाले की, सतत धमकीचे कॉल येत असल्याचे पोलिसांना सर्व काही माहित आहे. त्याचबरोबर किरीट सोमैय्या यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आवाहन दिले. ते म्हणाले की, जर त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी समोर येऊन लढायला हवे.

निवडणूक आयोगात माहिती लपवत असल्याचा आरोप करत भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर महिलेने बलात्काराची पोलिसात तक्रार दाखल केली आहे. बलात्काराचा आरोप झाल्यानंतर विरोधी पक्षाने भाजप धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

संबधित बातमी वाचा-अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडेंच्या मदतीला मनसेसह भाजपचे नेते

न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी घेणार निर्णय

राष्ट्रवादी कोअर कमिटीच्या बैठकीत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. त्यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांना अत्यंत गंभीर म्हटले होते. मात्र, मुंडेवर आरोप करणाऱ्या महिलेवरच मनसेसह भाजप नेत्याने आरोप केल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. कोणीही आरोप करावा, आणि लगेच निर्णय घ्यावा अशी परिस्थिती या प्रकरणात नाही. त्यामुळे यामध्ये तपासाअंती न्यायालय जो निर्णय देईल तो अंतिम असेल असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले.

संबधित बातमी वाचा-कोणीही आरोप करावा आणि त्यावर निर्णय घ्यावा, अशी परिस्थिती नाही - शरद पवार

बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवरच हनी ट्र्रॅपचा आरोप-

सामाजिक व न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराच्या आरोप करणाऱ्या महिलेवरच मनसे आणि भाजपच्या नेत्यांनी आरोप केला आहे. मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केलेल्या महिलेने आपल्याशीही जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजप नेते कृष्णा हेगडे आणि मनसे नेते मनीष धुरी यांनी केला आहे. याच महिलेने हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न केल्याचेही धुरी यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.