मुंबई - महाविकास आघाडीमध्ये असलेले शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी आपल्या मंत्रिपदाचा वापर जनहितासाठी न करता स्वतःच्या फायद्यासाठी करत असल्याचे आता समोर येऊ लागले आहे. मंत्री अनिल परब यांनी दापोली येथील मुरुड या भागामध्ये समुद्रकिनाऱ्यावर दहा कोटी खर्च करून बेकायदेशीरपणे बांधलेल्या रिसॉर्टबाबत भाजपचे नेते किरीट सोमैय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिल परब यांच्यावर आरोप लावले. सोमैय्या म्हणाले, हा रिसॉर्ट शेतजमिनीवर अनधिकृतपणे बांधलेला आहे. या सगळ्या प्रकरणा संदर्भात किरीट सोमैय्या यांनी स्थानिक जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे रीतसर कारवाईची मागणी केली होती, परंतु कोणतीच कारवाई स्थानिक प्रशासनाकडून होत नसल्यामुळे किरीट सोमैय्या यांनी थेट केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे या रिसॉर्ट संदर्भात तक्रार केली आहे.
अनिल परब यांचे शेतजमिनीवर अनधिकृत तीन मजली रिसॉर्ट.. त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा - किरीट सोमैय्या - अनिल परब
मंत्री अनिल परब यांनी दापोली येथील मुरुड या भागामध्ये समुद्रकिनाऱ्यावर दहा कोटी खर्च करून बेकायदेशीरपणे बांधलेल्या रिसॉर्टबाबत भाजपचे नेते किरीट सोमैय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिल परब यांच्यावर आरोप लावले आहेत.