मुंबई - खार येथील हायप्रोफाईल सोसायटीतील ज्वेलर्सच्या घरावर दरोडा टाकल्याप्रकरणी ( robbery in jewelers home ) खार पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये ज्वेलर्सच्या भावाचा समावेश आहे. त्याने मित्रांसह दरोड्याची योजना आखली होती. त्यांनी हा गुन्हा करण्यासाठी उत्तर प्रदेशातून तीन गुंडांना ( Accused arrested in Khar ) बोलाविले होते.
१० मार्च दुपारी अडीच वाजता तीन आरोपी हे दागिने असलेल्या ज्वेलर्सच्या घरात शिरले. धारावीत त्यांचे ज्वेलर्सचे दुकान होते. सराफा व्यावसायिकांची दोन मुले आणि पत्नीला तिन्ही आरोपींनी बंदूक आणि धारदार चाकूचा धाक दाखविले. घरातील २९. ६० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड पळवून नेल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तिघांविरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा-Virat Kohli Fans : सुरक्षा भंग केल्याप्रकरणी विराट कोहलीच्या 4 चाहत्यांवर पोलिसांची कारवाई
पोलिसांना गोंधळात टाकण्यासाठी कपडे बदलले..
पोलिसांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. पोलिसांना गोंधळात टाकण्यासाठी आरोपींनी वेगवेगळ्या ऑटोरिक्षांचा वापर केल्याचे आढळून आले. तीन आरोपींनी मास्क घातला होता. त्यातील एकाने टोपीदेखील वापरली होती. त्यांनी आधी वांद्रे रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी ऑटोरिक्षा घेतली. आरोपींनी नंतर पुन्हा दुसऱ्या ठिकाणाहून ऑटोरिक्षा घेतली. तिघे वेगवेगळ्या ठिकाणी गेले. पोलिसांना गोंधळात टाकण्यासाठी त्यांनी कपडेही बदलल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा-Minister Jitendra Awhad : महाराष्ट्रात विकासाची चर्चा होत नाही - मंत्री जितेंद्र आव्हाड
तिन्ही आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल
पोलीस पथकाने तांत्रिक तपशील आणि इतर स्रोतांच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला. सराफा व्यावसियाकाचा भाऊ आणि त्याच्या मित्रासह पाच आरोपींनी हा गुन्हा करण्यासाठी उत्तर प्रदेशातील तीन लोकांना कामावर ठेवले होते. या तिघांमध्ये यापूर्वी खून आणि खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या गुंडांचा समावेश आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा-Case Has Been Transferred to CID : गिरीश महाजन प्रकरण सीआयडीकडे, गृहमंत्र्यांची विधानसभेत माहिती
आरोपी 24 तासात गजाआड
मुंबई पोलिसांनी २४ तासांच्या आत सर्व आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडी सर्व सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जप्त केली आहे. पथकाने आरोपींकडून एक रिव्हॉल्व्हर, ४ जिवंत काडतुसे आणि दोन चॉपर जप्त केले आहेत.