मुंबई : महानगरपालिकेने कंगना रणौतला 'स्टॉप वर्क नोटीस' पाठवली आहे. तिच्या ऑफिसच्या परिसरात कोणतेही अधिकृत वा अनधिकृत बांधकाम सुरू नाहीये. त्यामुळे, हे काम थांबवण्यासाठीची नोटीस देण्याची काहीही गरज नव्हती. हे अतिशय चुकीचे असून, केवळ सूडबुद्धीने ही नोटीस पाठवण्यात आली आहे. राज्य सरकार हे केवळ आपल्या अधिकाराचा गैरवापर करत आहे, असा आरोप कंगना रणौतच्या वकिलांनी केला आहे.
तर कंगनाच्या वकिलांचे आरोप हे चुकीचे असल्याचे बीएमसीने म्हटले आहे. कंगनाला याआधीही आम्ही नोटीस दिली होती. तरीही तिच्या ऑफिस परिसरातील अनधिकृत बांधकाम सुरूच ठेवण्यात आले. त्यामुळे ही कारवाई करण्यात येत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. तसेच, याआधीच्या नोटीसला कंगनाने उत्तर न दिल्यास कार्यालयावरील कारवाईस तीच जबाबदार राहणार आहे, असे स्पष्टपणे सांगण्यात आले होते. तिने तरीही, या नोटीसला उत्तर दिले नाही, असेही महापालिकेने म्हटले आहे.
-
No work being carried out by Kangana Ranaut in her premises as falsely understood by you, so the notice issued by you as "Stop Work Notice" is absolutely bad-in-law & appears to have been issued only to intimidate her by misusing your dominant position: Kangana Ranaut's lawyer https://t.co/qVDRL64MwF pic.twitter.com/HCNxNfZYd1
— ANI (@ANI) September 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">No work being carried out by Kangana Ranaut in her premises as falsely understood by you, so the notice issued by you as "Stop Work Notice" is absolutely bad-in-law & appears to have been issued only to intimidate her by misusing your dominant position: Kangana Ranaut's lawyer https://t.co/qVDRL64MwF pic.twitter.com/HCNxNfZYd1
— ANI (@ANI) September 9, 2020No work being carried out by Kangana Ranaut in her premises as falsely understood by you, so the notice issued by you as "Stop Work Notice" is absolutely bad-in-law & appears to have been issued only to intimidate her by misusing your dominant position: Kangana Ranaut's lawyer https://t.co/qVDRL64MwF pic.twitter.com/HCNxNfZYd1
— ANI (@ANI) September 9, 2020
मुंबईबाबत वादग्रस्त विधान करणारी सिनेअभिनेत्री कंगना रणौत अडचणीत आली आहे. कंगनाच्या पाली हिल येथील "मणिकर्णिका" कार्यालयाची पालिका अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर रहिवासी घरातच व्यावसायिक कार्यालय बनवल्याचे समोर आले आहे. कंगनाच्या या कार्यालयात तसेच त्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम केल्याचे समोर आले आहे. यामुळे पालिकेने तिला बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी मंगळवारी 354 कलमान्वये नोटीस बजावली होती. या नोटीसला कंगनाने 24 तासांत उत्तर दिले नसल्याने नोटिसीचा कालावधी संपला आहे. यामुळे पालिकेने तोडक कारवाई सुरू केली आहे.
हेही वाचा : कंगनाच्या बेकायदेशीर बांधकामावर हातोडा, बीएमसीची तोडक कारवाई सुरू