ETV Bharat / city

'कंगनाला ड्युअल पर्सनॅलिटी, वैद्यकीय उपचारांची गरज'; अनिल परबांचा टोला

अनिल परब यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये कंगना, राज्यपाल कोश्यारी, केंद्र सरकार, रिपाईं अध्यक्ष रामदास आठवले आणि भाजप नेते किरीट सोमय्या या सर्वांवर टीकास्त्र सोडले. तसेच, मराठा आरक्षणाबाबत बोलताना, मराठा समाजाने आंदोलन करू नये, सरकार मराठा समाजासोबतच आहे. केवळ सत्ताधारी नाही, तर विरोधकांशी बोलून पुढील भूमिका घेणार आहोत, असेही ते म्हणाले.

'Kangana has dual personality, needs doctor', says a Shiv Sena leader
'कंगनाला ड्युअल पर्सनॅलिटी, वैद्यकीय उपचारांची गरज'; अनिल परबांचा टोला
author img

By

Published : Sep 15, 2020, 7:07 AM IST

मुंबई - कंगना रणौतला ड्युअल पर्सनॅलिटी आहे, तिला एका चांगल्या डॉक्टरची गरज आहे. ती केवळ अभिनेत्री असून तिला दिलेल्या स्क्रिप्टनुसार ती वागते. अशा कित्येक कंगना आल्या आणि गेल्या, अशी खोचक टीका शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी कंगनावर केली. "कंगनाला मुंबईबद्दल वाईट बोलत असेल, तर आम्ही ऐकून घेणार नाही. आपलं बस्तान तिने उचलावं हेच योग्य ठरेल आणि मुंबई तिला पाकव्याप्त काश्मीर वाटत असेल, तर तिने योग्य वाटतं असेल तिथं रहावे", असा सल्ला परब यांनी कंगनाला दिला.

'कंगनाला ड्युअल पर्सनॅलिटी, वैद्यकीय उपचारांची गरज'; अनिल परबांचा टोला

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अभिनेत्री कंगना रणौतला भेट दिल्यानंतर नवा वाद उफाळून आला आहे. "बेकादेशीर कामे करणाऱ्यांना राज्यपाल भेटत असतील तर फक्त कंगनाला का भेटता? बेकायदा बांधकामं तुटलेल्या सामान्य लोकांनाही भेटावं. तिचं बांधकाम तुटल्यावर इतका का पोटशूळ?”, अशी टीका परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्यपालांवर केली आहे.

उद्धव ठाकरेंचे व्यंगचित्र शेअर केल्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एका नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली होती. यावर, "नौदल अधिकारी असला म्हणून, काय काहीही करण्याचा अधिकार त्यांना नाही. आमच्या देवा समान नेत्यांवर चिखलफेक होत असेल तर शिवसैनिक सहन करू शकत नाहीत, शिवसेना मारहाणीचे समर्थन करत नाही, पण ती सैनिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती" असे स्पष्टीकरण परिवाहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहे.

मराठा आरक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले, की मराठा समाजाने आंदोलन करू नये, सरकार मराठा समाजासोबतच आहे. केवळ सत्ताधारी नाही, तर विरोधकांशी बोलून पुढील भूमिका घेणार आहोत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, चीन करत असलेल्या हेरगिरीबाबत केंद्राने विचार करायला हवा मात्र सरकारचे लक्ष केवळ प्रत्येक राज्यामध्ये सत्ता आणण्याकडे आहे असे म्हणत परब यांनी केंद्रावर निशाणा साधला. तर रामदास आठवले हे शटर अर्धे बंद झालेले दुकान आहे, त्यांना किती गांभीर्याने घ्यायचं? असे म्हणत त्यांनी आठवलेंवर टीका केली. किरीट सोमय्या यांच्या कार्यालयातही मला चहा प्यायला जायचं आहे. त्यांच्या कार्यालयाबाबत मला बरंच काही समजले आहे. मला भेट देवून पाहणी करायची आहे, असे म्हणत त्यांनी सोमय्यांवर टीका केली.

हेही वाचा : मंत्री अनिल परब यांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा - भाजपाची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.