मुंबई - बार्ज पी-305 हे तौक्ते चक्रीवादळात दुर्घटनाग्रस्त झाले. या दुर्घटनेत 51 जणांचा मृत्यू झाला आहे. कन्नमवार नगर येथे राहणारे कमलराज हे या बार्जवर काम करत होते. मात्र, या दुर्घटनेत कमलराज यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, त्यावेळी पत्नीसोबत बोलण्याची कमलराज यांची इच्छा होती, असे त्यांच्या सहकाऱयाने सांगितले आहे.
हेही वाचा - अंध आईवडिलांचा श्रावणबाळ गेला, मुंबईत झाडाची फांदी पडली तरुणाच्या डोक्यावर
या बार्जवर कमलराज यांच्यासोबत एक स्पिकरमॅन काम करत होते. ते स्पिकरमॅन या दुर्घटनेतून वाचले आहेत. दुर्घटनेतून बचावलेल्या स्पिकरमॅन यांनी कमलराज यांच्या कुटुंबियांना घडलेला प्रसंग सांगितला. या प्रसंगानुसार, कमलराज यांनी शेवटच्या श्वासापर्यंत बार्जवरील लोकांची मदत केली. कमलराज यांना शेवटच्या क्षणी पत्नीसोबत बोलण्याची इच्छा होती. मात्र, चक्रीवादळामुळे ते शक्य झाले नाही आणि अखेर कमलराज यांचा मृत्यू झाला.
दुर्घटनेला कॅप्टन जबाबदार
दरम्यान, बार्जच्या कॅप्टनला सूचना मिळूनसुद्धा त्याने बार्ज किनाऱयाला आणले नाही. कॅप्टनच्या बेजबाबदार वागण्यामुळे ही दुर्घटना घडली. याला कॅप्टनच दोषी आहे, असे कमलराज यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.
हेही वाचा - 'विरोधी पक्षाचे संकटाच्या काळातही राजकारण'