ETV Bharat / city

के. बी. भाभा रुग्णालय होणार १२ मजली , पालिका ३०२ कोटी रुपये खर्च करणार - भाभा रुग्णालय

मुंबईमध्ये कोरोनाच्या प्रसारादरम्यान रुग्णालयातील खाटा कमी पडल्या.  त्यासाठी पालिकेने कोविड सेंटर उभारली. रुग्णालयातील खाटा कमी पडल्याने पालिकेने आपल्या रुग्णालयातील क्षमता वाढवून ती सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे.

K. B. Bhabha Hospital
K. B. Bhabha Hospital
author img

By

Published : May 25, 2021, 7:15 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाच्या प्रसारादरम्यान रुग्णालयातील खाटा कमी पडल्या. त्यासाठी पालिकेने कोविड सेंटर उभारली. रुग्णालयातील खाटा कमी पडल्याने पालिकेने आपल्या रुग्णालयातील क्षमता वाढवून ती सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वांद्रे येथील के. बी. भाभा रुग्णालयाचे विस्तारीकरण व नुतनीकरण केले जाणार आहे. रुग्णालयाची तळमजली इमारत पाडून तेथे १२ मजली इमारत उभी केली जाणार आहे. शिवाय सद्या असलेल्या बहुमजली इमारतीचे नुतनीकरण केले जाणार आहे. त्यासाठी पालिका तब्बल ३०२ कोटींचा खर्च करणार आहे.

पालिका ३०२ कोटींचा खर्च करणार -

वांद्रेतील भाभा रुग्णालयाची तळमजली व बहुमजली इमारत आहे. यातील तळमजली इमारत पाडून विस्तारिकरण केले जाणार आहे. दोन बेसमेंट व तळमजलासह १२ मजली इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे. तसेच तेथील जुने मुख्य रुग्णालय असलेल्या १० मजली इमारतीची दुरुस्ती व नुतनीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. हे रुग्णालय ४९७ खाटांचे आहे. या इमारतींच्या कामाचे आराखडे, संरचनात्मक नकाशे, यांत्रिकी कामाचे अंदाजपत्रक प्रकल्प सल्लागाराने तयार केले आहे. यापूर्वी संपूर्ण कामाचा खर्च २८७.९३ कोटी रुपये इतका होता. त्यात आता १४ कोटी ९० लाख रुपये अतिरिक्त रक्कम वाढल्याने एकूण कंत्राटाची रक्कम ३०२ कोटी रुपये इतका झाली आहे. मे. क्वालिटी हाईटकॉन प्रा. लि. या कंत्राटदाराला हे काम दिले असून अतिरिक्त १४ कोटी ९० लाख ८२६ रुपये मोजले जाणार आहेत. इमारतीचे आराखडे व संरचनात्मक नकाशे बनवण्यासाठी सल्लागार मे. स्कायलाईन आर्किटेक्टस यांनी नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

२२ हजार पैकी १३ हजार बेड्स रिक्त -

मुंबईमध्ये सध्या महापालिका राज्य, केंद्र सरकार तसेच खासगी अशा २०७ रुग्णलयात कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या रुग्णालयात सध्या २२ हजार ७७ बेड्स आहेत. त्यामधील ८ हजार ३७३ बेडवर रुग्णांवर उपचार सुरु असून १३ हजार ७०४ बेड्स रिक्त आहेत. यावरून मुंबईमधील रुग्णालयांमधून उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.