मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरिवली येथे दिवसाढवळ्या घरात घुसून सोने चांदीच्या दागिन्यांची बॅग लंपास करणाऱ्या महिला चोरास बोरिवली पोलिसांनी अटक केली Jewellery Bag thief woman arrested आहे. मुंबईच्या कुर्ला परिसरातून आरोपी महिलेस अटक करण्यात आली असून तिच्याकडून आठ लाख 35 हजार किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत Stolen jewellery seized करण्यात बोरिवली पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव शितल उपाध्याय वय ३६ वर्षे असून तिच्यावर मुंबईच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये चोरीचे गुन्हे case registered against woman for jewellery theft नोंद आहे.
दागिन्यांच्या बॅगची शिताफीने चोरी - बोरिवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही दिवसा रेकी करायची आणि घरातील व्यक्तींची नजर चुकवून घरातील मौल्यवान व किमती ऐवज लंपास करत असे. बोरिवली पोलीस स्टेशन हद्दीतील साईबाबा नगर येथील दीप सोसायटीतील एक विदेशी महिला आपल्या आईकडे राहण्यासाठी आली असता 24 सप्टेंबरच्या दिवशी फिर्यादी महिला शॉपिंग करण्यासाठी बाहेर गेल्यानंतर फिर्यादीची आई घराचा दरवाजा उघडा ठेवूनच घरात झोपली होती. याच दरम्यान आरोपी महिलेने घरात घुसून सोने-चांदीच्या दागिन्यांची बॅग घेऊन आरोपी महिला फरार झाली.
सीसीटीव्ही फुटेजवरून लागला चोरीचा तपास - शॉपिंग वरून विदेशी महिला घरात परत आल्यानंतर दागिने असलेली बॅग गायब झाल्याचे लक्षात आले. यानंतर या महिलेने बोरिवली पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ तपासास सुरुवात केली परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिल्यानंतर महिला आरोपी दागिन्यांची बॅग घेऊन जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर या महिलेचे फोटो मुंबईतील सर्व पोलीस स्टेशनमध्ये पाठवल्यानंतर आरोपी महिला विनोबा भावे नगर कुर्ला पोलीस स्टेशन हद्दीत राहत असल्याची माहिती समजले. आरोपी महिलेचे नाव शितल अरुण उपाध्याय असल्याचे समजलं व नंतर बोरिवली पोलिसांनी सापळा रचून आरोपी महिलेला त्या परिसरातून अटक केली व घरात झाडाझडती घेऊन लपवून ठेवलेली दागिन्याची बॅग हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती बोरीवली पोलिसांनी दिली.
आरोपी महिलेचा कसून तपास - सध्या आरोपी महिला बोरिवली पोलिसांच्या ताब्यात असून बोरिवली पोलीस आरोपीचा अधिक तपास करत आहेत. चोरी केलेले दागिने ही महिला कुणाकुणाला विकायची याचा तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.