ETV Bharat / city

जीन करत होता घरातील दागिन्यांची चोरी? पोलीस तपासात हे समोर आले..

भायखळा पूर्व (Byculla east) येथील माझगाव येथे 40 वर्षीय व्यापाराच्या घरात फेब्रुवारी ते सप्टेंबर महिन्यादरम्यान घरातील दाग-दागिने आपोआप गायब होत होते. मात्र, घरातील वातावरण धार्मिक असल्याने घरातील दागिने काल्पनिक जीन गायब करत असल्याचा त्यांचा समज झाला..(Jean stealing jewelry from house).

author img

By

Published : Oct 12, 2022, 4:13 PM IST

caught men
अटक झालेले युवक

मुंबई: भायखळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी एका अजब चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे (theft in Byculla). भायखळा पूर्व येथील माझगाव येथे 40 वर्षीय व्यापाराच्या घरात फेब्रुवारी ते सप्टेंबर महिन्यादरम्यान घरातील दाग-दागिने आपोआप गायब होत होते. मात्र, घरातील वातावरण धार्मिक असल्याने घरातील दागिने काल्पनिक जीन गायब करत असल्याची बतावणी करत भाचीनेच मालमत्तेवर डल्ला मारल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. (Jean stealing jewelry from house). याप्रकरणी भायखळा पोलिसांनी अल्पवयीन भाचीला ताब्यात घेऊन गुजरात मधून तिच्या भावाला देखील अटक केली आहे.

भायखळा पोलीस ठाण्यात अब्दुलकादर शब्बीर गोघावाला (४०) यांनी 23 सप्टेंबर ते 24 सप्टेंबरदरम्यान त्यांच्या घरामध्ये ठेवलेला चार लाखांचा सोन्याचा दागिना आणि दहा लाखांची रोख रक्कम अशी एकूण 14 लाख किमतीची मालमत्ता कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराच्या उघड्या दरवाज्यातून प्रवेश करून चोरी केल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार भायखळा पोलीस ठाण्यात कलम 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी तपास सुरू केला.

jewelry and cash money
दागिने आणि रोख रक्कम

काल्पनिक जीन चोरी करत असल्याचा समज: भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक खोत यांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलीस तपासादरम्यान अब्दुल कादर यांनी फेब्रुवारी 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत देखील अशा प्रकारे घरातील सोन्याचे दागिने गायब झाल्याचे सांगितले. घरातील वातावरण धार्मिक असल्याने दागिने काल्पनिक जीन घरातून गायब होत करत असल्याचा घरच्यांचा समज होता. त्यामुळे अब्दुलकादर यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नव्हती. त्यांनी ती जागा विकून दुसरीकडे राहण्यास जाण्याचे ठरवले होते. मात्र, 23 सप्टेंबर रोजी दहा लाख रुपये आणि चार लाखांचा सोन्याचा दागिना चोरी झाल्यानंतर अब्दुलकादर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

चोरीचे धागे गुजरात पर्यंत: तपासा दरम्यान पोलीसांनी घरातील सर्व इसमांची कसून चौकशी केल्यानंतर अब्दुलकादर यांची भाचीच हे दागिने चोरी करून तिच्या गुजरातमध्ये राहणाऱ्या चुलत भावाला पाठवत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन भाचीला ताब्यात घेतले आणि त्यानंतर गुजरात येथून हुसेन पत्रावाला (19), हुसेन मुर्तजा बॉम्बेवाला (२२) आणि अब्बास अत्तारी (22) या तीन आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपींकडून 552 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने आणि दहा लाख रोख रक्कम अशी एकूण 40 लाख 18 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.