मुंबई - माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी कथित वसुली प्रकरणात सीबीआयने अॅड. जयश्री पाटील यांना चौकशी करिता आज बोलवले होते. जयश्री पाटील यांच्यासोबत अॅड. गुणरत्न सदावर्ते हे देखील सीबीआय कार्यालयात पोहचले आहे. अनिल देशमुख कथित वसुली प्रकरणात जयश्री पाटील यांनी सीबीआयला तक्रार केली होती.
हेही वाचा - Pawar On Elections : दिल्लीतील कामगिरीमुळे आपचा पंजाबमध्ये विजय, काॅंग्रेसला झटका - शरद पवार
कथित 100 कोटी वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख कारागृहात आहेत. मागील आठवड्यात अनिल देशमुख यांचा जबाब नोंदवण्यासाठी सीबीआयचे अधिकारी आर्थर रोड कारागृहात गेले होते. त्यानुसार सीबीआय आर्थर रोड कारागृहात तीन दिवस जबाब नोंदवणार आहे. यापूर्वी सीबीआयने निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे, कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांचे जबाब नोंदवले आहे.
सीबीआयने आतापर्यंत या प्रकरणात सचिन वाझे, अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांची चौकशी देखील केली आहे. या तिन्ही आरोपींचा कारागृहांत जाऊन सीबीआयने जबाब नोंदविला होता. आता या प्रकरणात अनिल देशमुख यांचा देखील आर्थर रोड जेलमध्ये जाऊन जबाब नोंदवणार आहे.