ETV Bharat / city

Jayant Patil : 'आरक्षणाशिवाय निवडणुका होणे म्हणजे ओबीसी समाजावर घोर अन्याय' - जयंत पाटील नगरपरिषद निवडणूक

ओबीसी आरक्षणाशिवाय होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे. आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटलं ( jayant patil react on obc reservation ) आहे.

Jayant Patil
Jayant Patil
author img

By

Published : Jul 10, 2022, 4:04 PM IST

मुंबई - राज्य निवडणूक आयोगाने ९२ नगरपरिषद व ४ नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम ( nagarpanchayat nagarparishad election ) जाहीर केला आहे. यावरती आता राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेक्षाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या निवडणुकांवर आक्षेप घेतला आहे. या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे. आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

ट्विट करत जयंत पाटील म्हणाले की, ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाविकास आघाडी सर्वोतोपरीने प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळसाहेब पहिल्या दिवसापासून स्वतः यामध्ये जातीने लक्ष घालत आहेत. महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या बांठिया आयोगाने इम्पिरिकल डाटा गोळा करून अहवालही तयार केला आहे.

  • राज्य निवडणूक आयोगाने ९२ नगर परिषद व ४ नगर पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे म्हणून आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाम आहे.@NCPspeaks

    — Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महाविकास आघाडीने केलेल्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल. ओबीसी समाजाला आरक्षण मिळेल, याबाबत पूर्ण विश्वास आहे. ही लढाई अंतिम टप्प्यात असून, निवडणूक घेण्याचा अट्टाहास करू नये, अशी विनंतीही जयंत पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा - शिवसेनेच्या आमदारांना विधिमंडळ सचिवांच्या नोटिसा; आदित्य ठाकरेंना नोटीस नाही...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.