ETV Bharat / city

जसलोक बनले कोरोना रुग्णालय, ४० आयसीयूसह २५० बेड वाढणार - जसलोक बनले कोरोना रुग्णालय

मुंबईत गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर, रुग्णांना बेड कमी पडू नयेत, यासाठी पालिका रुग्णालये, जम्बो रुग्णालयांतील बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन बेडची संख्या वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांचे 80 टक्के बेड ताब्यात घेण्यात आले आहेत.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Apr 15, 2021, 9:11 PM IST

मुंबई - शहरातील रुग्णसंख्या वाढत असताना आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड्सची कमतरता भासत आहे. रुग्णांना बेड्स मिळावे आणि त्यांच्यावर उपचार करता यावेत म्हणून पालिकेने खासगी रुग्णालये ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेने जसलोक या सुपर स्पेशालिटी खासगी रुग्णालयाला पूर्णपणे कोरोना रुग्णालय करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ४० आयसीयूसह २५० बेड वाढणार असल्याची माहिती पालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली.

बेड्स वाढणार -

मुंबईत गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर, रुग्णांना बेड कमी पडू नयेत, यासाठी पालिका रुग्णालये, जम्बो रुग्णालयांतील बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन बेडची संख्या वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांचे 80 टक्के बेड ताब्यात घेण्यात आले आहेत. लक्षणे नसलेल्या आणि सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी खासगी रुग्णालयांबरोबर टायअप करत पंचतारांकित हॉटेल्समध्ये उपचारांची सुविधा सुरू केली आहे. दरम्यान, बीकेसीतील ट्रायडंटमध्ये रिलायन्स रुग्णालयाच्या मदताने २० बेड आणि मरीन ड्राईव्ह येथील इंटर काँटिनेंटल हॉटेलमध्ये बॉम्बे रुग्णालयाच्या मदतीने २२ बेड आजपासून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर आजपासून सेव्हन हिल्समध्ये ३० आयसीयू बेड उपलब्ध झाले असून येत्या आठवडाभरात नेस्को कोरोना केंद्रात १५०० ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिली.

कोरोना रुग्णालयात रूपांतर -

मुंबई गेल्यावर्षी कोरोनाचा प्रसार होत असताना जसलोक रुग्णालय प्रशासनाने कोरोना रुग्णांसाठी बेडची सुविधा देण्यास सुरुवात केली होती. ही सेवा देताना जसलोकमधील डॉक्टर, परिचारिका तसेच इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. मात्र, कोरोनाला रोखण्यासाठी जसलोक रुग्णालयाने नेहमीच सहकार्य करून योगदान दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर, आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी जसलोक रुग्णालयांचे रूपांतर पूर्णपणे कोरोना रुग्णालयात करण्याचा निर्णय घेऊन त्याची तातडीने अंमलबजावणी करा, असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहे.

रुग्णालयाला दिले हे आदेश -

रुग्णालयात विशेष वॉर्डमध्ये अ‌ॅडमिट असलेले पण प्रकृती स्थिर असलेले, डॉक्टरांच्या वैद्यकीय देखरेखीची आवश्यकता नसलेल्या रुग्णांना डिस्चार्ज देणार आहे. नव्याने कोणत्याही नॉन-कोविड रुग्णांना अ‌ॅडमिट करता येणार नाही. अ‌ॅडमिट असलेले पण अत्याधिक वैद्यकीय देखरेखीची आवश्यकता असलेल्या नॉन-कोरोना रुग्णांना ४८ तासांच्या आत दुसऱ्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात येणार आहे. तातडीच्या शस्त्रक्रियेची आवश्यकता नाही, अशा सर्व शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.