ETV Bharat / city

ड्रग्जचा खेळ गुजरातमधून चालवला जातो का? नवाब मलिकांचा सवाल - Nawab Malik

गुजरातमधून देशभरात ड्रग्ज पसरवले जात आहे. हा ड्रग्जचा खेळ गुजरातमधून चालवला जातो का, असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. याच्यामध्ये कोणताही राजकीय हेतू न ठेवता यातील संबंधीतांवर कारवाई करून त्यांना तत्काळ एनसीबीने अटक करायला पाहिजे, ही आमची मागणी आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

नवाब मलिक
नवाब मलिक
author img

By

Published : Nov 11, 2021, 11:29 AM IST

Updated : Nov 11, 2021, 12:17 PM IST

मुंबई - गुजरातमधून देशभरात ड्रग्ज पसरवले जात आहे. हा ड्रग्जचा खेळ गुजरातमधून चालवला जातो का, असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. याच्यामध्ये कोणताही राजकीय हेतू न ठेवता यातील संबंधीतांवर कारवाई करून त्यांना तत्काळ एनसीबीने (NCB) अटक करायला पाहिजे, ही आमची मागणी आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

एनसीबीच्या डीजींना आवाहन

मनीष भानुशाली, धवल भानुशाली, केपी गोसावी हे गुजरातमधून ड्रग्जचा धंदा ऑपरेट करत आहेत. ते वारंवार गुजरातमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहातात. गुजरातच्या मंत्र्यांना सातत्याने भेटत असतात. हे लोक गुजरातमधून ड्रग्जचा व्यापार करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला आहे. दरम्यान, एनसीबीच्या डीजींना आवाहन आहे, की त्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता या ड्रग्जच्या धंद्याची पाळेमुळे उखडून टाकली पाहिजे असही ते म्हणाले आहेत.

देशामधून अमली पदार्थाचा धंदा नेस्तनाबूत झाला पाहिजे

मुंबईत काही ग्रॅम ड्रग्ज सापडले की मुंबईत ड्रग्जचा धंदा सुरु असल्याचे, मुंबईला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. मग गुजरातमध्ये ३५० कोटींचे ड्रग्ज (Dwarka Drugs Case) सापडत असेल तर त्याचा कसून तपास झाला पाहिजे, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. त्यापूर्वी मुंद्रा पोर्टमध्ये २७ कोटींचे ड्रग्ज उतरवले गेले होते. देशामधून अमली पदार्थाचा धंदा नेस्तनाबूत झाला पाहिजे, असा कायदा झाला पाहिजे, अशी मागणीही मलिक यांनी यावेळी केली आहे.

हेही वाचा - डॉक्टर वडिलांचे कोरोनामुळे निधन झालं, मुुलीने मांडली कुटुंबाची व्यथा; ईटीव्ही भारत'चा आढावा

Last Updated : Nov 11, 2021, 12:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.