ETV Bharat / city

Koregaon Bhima Violence : चौकशी आयोगापुढे रश्मी शुक्ला हजर, पण... - कोरेगाव भीमा दंगल

कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी(Koregaon Bhima Violence) आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला(IPS officer Rashmi Shukla) यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगापुढे(Koregaon Bhima Commission) हजेरी लावली. मात्र, काही कागदपत्र नसल्याने त्यांची साक्ष नोंदवण्यात आली नाही.

IPS officer Rashmi Shukla
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला
author img

By

Published : Nov 18, 2021, 5:27 PM IST

Updated : Nov 18, 2021, 10:15 PM IST

मुंबई - कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी(Koregaon Bhima Violence) पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला(IPS officer Rashmi Shukla) यांची कोरेगाव भीमा चौकशी आयोगापुढे(Koregaon Bhima Commission) साक्ष नोंदवण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांनी आयोगापुढे हजेरी लावली. मात्र, काही आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने त्यांची साक्ष नोंदवण्यात आली नाही. दरम्यान, पुढील तारीख अद्याप निश्चित झालेली नाही, अशी माहिती विशेष सरकारी वकील शिषीर हिरे यांनी दिली.

  • She (Rashmi Shukla) appeared before the Commission today to record her statement for examination but due to some unavailable documents, her statement couldn't be recorded today. Next date yet to be decided: Advocate Shishir Hire, special public prosecutor#Maharashtra pic.twitter.com/gGxYdXazrO

    — ANI (@ANI) November 18, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • रश्मी शुक्ला चौकशी समितीसमोर हजर -

मुंबईत दोन दिवस रश्मी शुक्ला यांची साक्ष नोंदवली जाणार होती. २०१८ मध्ये कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीनंतर राज्य सरकारने या प्रकरणी कोलकाता हायकोर्टाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या नेतृत्वाखालील चौकशी आयोग नेमला आहे. या आयोगाकडून सध्या शुक्ला यांची साक्ष नोंदवली जात आहे.

  • काय आहे प्रकरण ?

आयपीएस अधिकारी परमबीर सिंह (Parambir Singh) आणि रश्मी शुक्ला(Rashmi Shukla) यांना समन्स बजावण्याचे आदेश कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने दिले होते. आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी या संदर्भात अर्ज केला होता. कोरेगाव भीमा हिंसाचार घडला त्यावेळी परमबीर सिंह हे ADG law and order व शुक्ला या पुणे पोलीस आयुक्त होत्या.

कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचार घटनेच्या अनुषंगाने त्यांच्याकडील इंटेलिजन्स इनपुट व इतर माहिती महत्वाची असल्याने, त्यांची साक्ष आवश्यक असल्याचे आशिष सातपुते यांनी म्हटले होते. सातपुते यांचा अर्ज मंजूर करताना आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांनी परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला यांना समन्स जारी करण्याचे आदेश दिले होते.

आज सह्याद्री अतिथीगृहात शुक्ला यांनी साक्ष नोंदवण्यासाठी आयोगासमोर हजेरी लावली. तसेच शपथपत्र दाखल करण्यासाठी वेळ मागितला. मात्र, कार्यक्रमाबाबत पुणे पोलिसांकडून काही कागदपत्रे मिळणे बाकी असल्याचे शुक्ला यांनी आयोगापुढे स्पष्ट केले. त्यामुळे पुन्हा आयोगाने शुक्ला यांना चौकशीसाठी बोलावले आहे. दरम्यान, पुढील तारीख अद्याप निश्चित झालेली नाही, अशी माहिती विशेष सरकारी वकील शिषीर हिरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनाही आयोगाने समन्स बजावले होते. मात्र, ते हजर झाले नाहीत. आता परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले.

Last Updated : Nov 18, 2021, 10:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.