ETV Bharat / city

MLA Atul Bhatkhalkar : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शरद पवारांची चौकशी करा - अतुल भातखळकर - गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सहभागाची कालबद्ध मर्यादेत चौकशी (Investigate Sharad Pawar in Patra Chawl Case) करावी अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर (MLA Atul Bhatkhalkar) यांनी केली आहे.

MLA Atul Bhatkhalkar
शरद पवारांची चौकशी करा
author img

By

Published : Sep 20, 2022, 5:11 PM IST

मुंबई - पत्राचाळ गैर व्यवहार प्रकरणी एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत जेलमध्ये असताना, आता या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांचा सुद्धा सहभाग असल्याचा आरोप भाजप नेते, अतुल भातखळकर (MLA Atul Bhatkhalkar) यांनी केला आहे. तसेच याप्रकरणाची कालबद्ध मर्यादेत चौकशी (Investigate Sharad Pawar in Patra Chawl Case) करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करतांना भाजप आमदार अतुल भातखळकर

काय म्हटले आहे पत्रात? : मराठी माणसाला बेघर करणाऱ्या पत्राचाळीच्या भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये गुरुआशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे, याकरिता तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी एक बैठक घेतली. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळे मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी, अशी मागणी भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.

विश्लेषण करणारे पत्र : यासंदर्भात त्यांनी तत्कालीन गृहनिर्माण सचिवांचे विश्लेषण करणारे पत्र दिलेले आहे. या पत्रावरुन हे स्पष्ट होते की, म्हाडा जरी प्राधिकरण असले तरी म्हाडा अधिकाऱ्यांवर निर्णय घेत असताना बाह्य शक्तींचा दबाव होता आणि त्यामुळे या चौकशीच्या प्रकरणाचे धागेद्वारे हे दूरवर म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपर्यंत जात आहेत. मराठी माणसाला न्याय देण्याकरता आणि त्यातील खरे सत्य बाहेर येण्याकरता या संदर्भातली एक उच्चस्तरीय कालबद्ध मर्यादेची चौकशी करावी, अशी मागणी आमदार भातखळकर यांनी या पत्राद्वारे केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.