आंतरराष्ट्रीय महिला दिन ( International Women's Day ) महिला दिन (Women's Day) हा महिलांना अधिक मजबूत बनवण्याचा नाही. महिला आधीच सशक्त आहेत. जगाला समस्त महिला वर्गाची ताकद दाखवून देण्याचा आहे.
जगभरात महिलांच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरव करण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. युनायटेड नेशन्सने 1977 मध्ये या दिनाला जगभर मान्यता दिली. दरवर्षी 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो.
यंदाच्या जागतिक महिला दिनाची थीम (International Women’s Day) उद्याच्या शाश्वत विकासासाठी लैंगिक समानता अशी आहे. जगभरातील महिला आणि मुलींचे योगदान अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने आज आपण अशाच काही कर्तृत्ववान महिलांविषयी जाणून घेणार आहोत...
आनंदीबाई गोपाळराव जोशी :- आनंदीबाई गोपाळराव जोशी ( Anandibai Gopalrao Joshi ) यांचा जन्म 31 मार्च 1965 रोजी कल्याणमधील एका मराठी कुटुंबात झाला. त्या 1887 मधील पहिल्या भारतीय महिला डॉक्टर बनल्या. त्या पहिल्या भारतीय महिला पाश्चात्य औषधांचे प्रशिक्षण घेणाऱ्या त्या पहिला महिला ( Western medicine ) होत्या. युनायटेड स्टेट्समध्ये प्रवास करणारी पहिली महिला होती.
तेजस्विनी सावंत :- नेमबाज तेजस्विनी सावंत हिचा जन्म 12 सप्टेंबर 1980 रोजी कोल्हापुरात झाला. तेजस्विनीने भारताचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक पटकावले. तसेच तिने ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ५० मीटर रायफलसह तिसरे स्थान मिळवत अंतिम फेरीत ४५७.९ गुण मिळवले. तिने 2006, मेलबर्न ला झालेल्या कॉमन वेल्थ गेम्समध्ये ( Common Wealth Games ) 10 मीटर एअर रायफलमध्ये ( 10 M Air Rifle ) पहिले सुवर्णपदक मिळवले. आतापर्यंत तिने 4 सुवर्ण पदके, 3 रौप्य पदके आणि 2 कांस्य पदके मिळवली आहेत. जागतिक नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला आहे. 2011 साली भारताच्या राष्ट्रपतींनी तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले होते.
सिंधुताई सपकाळ :- ‘अनाथांची आई’ या नावाने ओळखल्या जाणार्या सिंधुताई सपकाळ यांचे ( Sindhutai Sapkal ) यांचे ४ जानेवारी २०२२ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. परंतु त्यांचे कार्य लाखो हृदयात जिवंत राहील. सिंधुताई सपकाळ या भारतीय समाजसेविका आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांनी हजारो अनाथ तसेच निराधार मुलांचे संगोपन केले. त्यांना २०२१ मध्ये सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
लीना नायर : फ्रेंच लक्झरी हाऊस चॅनेलच्या जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी ( chief executive officer ) (CEO), लीना नायर या देखील युनिलिव्हरच्या पहिल्या महिला आणि सर्वात तरुण-मुख्य मानव संसाधन अधिकारी (CHRO) आहेत. या महाराष्ट्रीय वंशाच्या मुलीने तिच्या कंपनीत फक्त दोन टक्के महिला कर्मचारी असताना व्यवस्थापनात कारकीर्द सुरू केली. 2021 च्या फॉर्च्यून इंडियाच्या सर्वात शक्तिशाली महिलांमध्येही तिचा समावेश होता. याआधी तिने वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले.
हेही वाचा - मुंबई : आशियातील प्रथम महिला ट्रेन चालक यांच्या नेतृत्वात महिला दिन साजरा