ETV Bharat / city

'कोरल बचाव' मोहीम तीव्र; कोस्टल रोड प्रकल्पात आता हाजीअली-वरळीतील प्रवाळांचाही बळी?

author img

By

Published : Nov 4, 2020, 5:03 PM IST

Updated : Nov 4, 2020, 5:55 PM IST

दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून कोस्टल रोड प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला आहे. मात्र, हा प्रकल्प विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरला असून, याविरोधात उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत याचिका दाखल झाल्या आहेत.

Coastal Road project
'कोरल बचाव मोहीम तीव्र

मुंबई - दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून कोस्टल रोड प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला आहे. मात्र, हा प्रकल्प विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरला असून, याविरोधात उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत याचिका दाखल झाल्या आहेत. अशात या प्रकल्पाला आता आणखी एका वादाचे ग्रहण लागणार आहे. कारण या प्रकल्पासाठी वरळी, हाजीअली येथील प्रवाळांचे (कोरल) पुनर्वसन करण्यात येणार आहे. पण या प्रवाळाचे पुनर्वसन करताच येत नसुन, असे करत पालिका प्रवाळ आणि एकूणच समुद्री जीव नष्ट करणार असल्याचे म्हणत आता याला जोरदार विरोध होऊ लागला आहे. तर आता यासाठी सेव्ह आरेच्या धर्तीवर 'कोरल बचाव' मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रवाळ वाचण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

हेही वाचा - चैत्यभूमीवरील आंदोलनात काँग्रेसचे अर्धा डझनहून अधिक मंत्री उपस्थित; केंद्र सरकार आणि भाजपविरोधात एल्गार

मेट्रो 3 प्रमाणेच वादग्रस्त प्रकल्प

नरीमन पॉईंटवरून थेट बोरिवली-दहिसरला पोहचणे शक्य व्हावे आणि दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी पालिकेने 9.97 किमीचा आणि अंदाजे 13 हजार कोटी(प्रस्तावित खर्च) खर्चाचा कोस्टल रोड प्रकल्प हाती घेतला आहे. 2018 मध्ये या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. तर हा प्रकल्प 2022 पर्यंत पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस आहे. मात्र हा प्रकल्प कुलाबा-वांद्रे-सीपझ मेट्रो 3 प्रकल्पाप्रमाणेच अनेक कारणांमुळे सुरुवातीपासून वादग्रस्त ठरला आहे. या प्रकल्पामुळे सागरी जीव आणि पर्यावरण धोक्यात येणार आहे. तर मच्छिमारी व्यवसायही संकटात येणार आहे. त्याचवेळी महत्वाचे म्हणजे या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर भराव टाकला जाणार असल्याने मुंबईत पूरस्थिती निर्माण होणार आहे, असे म्हणत पर्यावरणप्रेमी आणि मच्छिमारांनी याला जोरदार विरोध केला आहे. हा प्रकल्प रद्द करण्याची ही मागणी आहे. तर हा वाद न्यायालयात गेला असून कित्येकदा न्यायालयाने कामाला स्थगितीही दिली होती. एकूणच हा प्रकल्प वादग्रस्त ठरला असताना आता आणखी एका नवीन वादाला सुरुवात होणार आहे आणि तो म्हणजे प्रवाळांच्या पुनर्वसनाचा.

coral
कोस्टल रोड प्रकल्प
प्रवाळांचे पुनर्वसन

कोस्टल रोडच्या कामासाठी वरळी-हाजीअली परिसरातील प्रवाळ अर्थात समुद्रीजीव-प्राणी यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी आवश्यक ती परवानगीही घेण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान मुंबईत प्रवाळांच्या 8 ते 10 प्रजाती आहेत. तर प्रवाळांच्या 18 वसाहती आहेत. भरती आणि ओहोटी रेषेच्या भागात हे समुद्री जीव अर्थात प्रवाळ आढळतात. हार्ड आणि सॉफ्ट अशा दोन प्रकारात प्रवाळ असतात आणि या प्रवाळांमध्ये खेकडे, समुदी गोगलगाय, स्टार फिश अन्य जीव राहतात, अंडी घालतात. एकूणच हा परिसर आणि प्रवाळ इको सिस्टीममधील महत्वाचा घटक आहे. असे असताना कोस्टल रोडसाठी वरळी-हाजी अली परिसरातील अंदाजे 500 चौमी खडकाळ भागातील प्रवाळ हटवले जाणार आहेत. त्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे अशी माहिती कोस्टल रोड प्रकल्पाविरोधातील याचिककर्त्या श्वेता वाघ यांनी दिली आहे. एक-एक करत पालिका कोस्टल रोड साठी संपूर्ण सागरी जीवन, सागरी संपत्ती धोक्यात आणत असल्याचे म्हणत त्यांनी याला विरोध केला असून ही बाब ही आता न्यायालयासमोर मांडली जाणार आहे.

प्रवाळांचे पुनर्वसन अशक्य

परदेशात प्रवाळांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. पण हे पुनर्वसन फारच कमी टक्के यशस्वी ठरले आहे. अशात मुंबईत जी प्रवाळ आहेत ती वेगळ्या प्रकारची असून खडकावर आहेत. अशावेळी या प्रवाळांचे पुनर्वसनच होऊ शकत नाही अशी माहिती डॉ वर्धन पाटणकर, समुद्री विज्ञान अभ्यासक (कोरल विषयावर विशेष अभ्यास) यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे. मुंबईतील प्रवाळ काढून त्यांचे दुसरीकडे पुनर्वसन करता येणार नाहीच पण ते खडक काढतानाच प्रवाळाचा बळी जाईल अशी शक्यता ही त्यांनी व्यक्त केली आहे. प्रवाळ पुनर्वसन यशस्वी होण्याची 1 टक्के ही शक्यता नसल्याने पालिकेच्या या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

coral
'कोरल बचाव मोहीम तीव्र
प्रवाळांनाही जगण्याचा हक्क, कायद्याने संरक्षण

वन्य प्राण्यांना जसे जगण्याचा हक्क आहे, त्यांना कायद्याने संरक्षण आहे. त्याचप्रमाणे प्रवाळानाही कायद्याचे संरक्षण आहे. पण आपण विकासासाठी झाडे, जंगल नष्ट करत होतो आता समुद्री जीव नष्ट करत सर्व पर्यावरणच नष्ट करत चाललो असून हे भविष्याच्या दृष्टीने घातक असल्याची प्रतिक्रिया मरीन लाइफ ऑफ मुंबईचे संस्थापक प्रदीप पाताडे यांनी दिली आहे. तर विकासाला आमचा मुळीच विरोध नाही.पण विकास करताना आधी त्याचा कुठे आणि काय फटका बसणार आहे, कमीत कमी पर्यावरणाला धक्का पोहचवत प्रकल्प कसे साकारता येतील याचा विचार होणे गरजेचे आहे. पण कोस्टल रोड असो वा मेट्रो 3 आरे कारशेड आपण याउलट करताना दिसत आहोत असे म्हणत पाताडे यांनी नियोजन शून्यरित्या राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे.

कोरल वाचणार?

वरळीहाजीअली परिसरातील प्रवाळ कुलाबा,गीता नगर आणि मरीन ड्राईव्ह येथे पुनर्वसित केले जाणार आहेत. पण अभ्यासकांच्या मते एकही प्रवाळ यात वाचणार नाही. त्यातच प्रवाळ काढल्यास समुद्री जीवनच धोक्यात येणार आहे. मासे कमी होणार आहेत. तर याचे इतरही गंभीर परिणाम दिसुन येणार आहेत. त्यामुळे आता पर्यावरण प्रेमी, मच्छिमार आणि समुद्री अभ्यासकांनी 'कोरल बचाव'मोहीम सुरू केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून याद्वारे जनजागृती करत जनचळवळ उभारत प्रवाळ वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. हे प्रयत्न यशस्वी होतात का आणि प्रवाळांना जीवदान मिळत का हे येणाऱ्या काळातच समजेल.

Last Updated : Nov 4, 2020, 5:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.