ETV Bharat / city

Mumbai Session Court: एखाद्या व्यक्तीला शिविगाळ किंवा धमकी देणे म्हणजे जीवघेणा हल्ला नव्हे; सत्र न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण - 15 years of waiting for justice

अतिक्रमण हटवायला आलेल्या मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्याला ( BMC action against unauthorized meat seller ) शिविगाळ आणि धमकी दिल्याच्या ( meat seller threatening to BMC employee ) आरोपातून एका मटन विक्रेत्याची तब्बल 15 वर्षांनी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने याप्रकरणी निर्णय ( Mumbai Session Court decision ) दिला. भीती निर्माण करण्यासाठी किंवा चीड आणण्यासाठी केली गेलेली शिवीगाळ असेल किंवा धमकी देण्यात आलेली असेल तर त्याचा अर्थ हल्ला झाला असे मानता येणार नाही, असे मुंबई सत्र न्यायालयाने स्पष्ट केले.

Mumbai Session Court
मुंबई सत्र न्यायालय
author img

By

Published : Jul 26, 2022, 7:41 PM IST

मुंबई- मुंबई परिसरात अनधिकृत मटन विक्रेतावर कारवाई ( BMC action against unauthorized meat seller ) करण्याकरिता गेलेल्या महापालिका कर्मचाऱ्याला विक्रेत्याकडून करण्यात आलेले शिवीगाळ व धमकी ( meat seller threatening to BMC employee ) नंतर संबंधित पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला निकाली काढत मुंबई सत्र न्यायालयाने महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. त्यानुसार एखादा व्यक्तीला शिविगाळ करणे किंवा धमकी देणे म्हणजे जीवघेणा हल्ला ( Fatal attack of mutton seller on BMC Employee ) नव्हे असे म्हटले आहे. हे प्रकरण 15 वर्ष जुन्या प्रकरणावर मुंबई सत्र न्यायालयाने निकाल ( Mumbai Session Court decision ) देत विक्रेत्याला दिलासा दिला आहे.

मटन विक्रेत्याची निर्दोष मुक्तता - तब्बल 15 वर्ष जुन्या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. मुंबई सत्र न्यायालयात बेकायदेशीर दुकानावर कारवाई करताना बीएमसी अधिकाऱ्यांना शिविगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणा दाद मागण्यात आलेली होती. यावेळी बीएमसीकडून तबरेझ कुरेशी या 42 वर्षांच्या दुकानदावर पालिकेकडून आरोप करण्यात आलेले होते. या आरोपांचे खंडण करत न्यायालयाने तबरेझ यांना निर्दोष मुक्त केले आहे. मुंबई सत्र न्यायालयात सुरु असलेल्या या प्रकरणी आरोपी तबरेझची ओळख पटवण्यातही असमर्थता दर्शवण्यात उशीर केला होता. तसेच कुणीही आपल्या साक्षीमध्ये तबरेझ यांने पालिका अधिकाऱ्यांवर हल्ला केला, असा ठोस पुरावा न्यायालयाला आढळून आलेला नव्हता.

न्यायालयाचे निरीक्षण - भीती निर्माण करण्यासाठी किंवा चीड आणण्यासाठी केली गेलेली शिवीगाळ असेल किंवा धमकी देण्यात आलेली असेल तर त्याचा अर्थ हल्ला झाला असे मानता येणार नाही असे मुंबई सत्र न्यायालयाने स्पष्ट केले. एका व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी कारवाई करावी असा खटला दाखल करण्यात आला होता. बेकायदेशीर मटण दुकानावर बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली होती.

15 वर्षांनंतर न्याय - त्यावेळी या मटण दुकानाच्या मालकाने शिविगाळ केल्याची आणि धमकी दिल्याची तक्रार देण्यात आली होती. या व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी शिक्षा केली जावी, अशी मागणी करण्यात आलेली होती. बीएमसी अधिकाऱ्यांनी 2005 साली केलेल्या कारवाईप्रकरणी हा खटला प्रशासनाकडून दुकान विक्रेत्यावर दाखल करण्यात आला होता.

न्यायालयाचे निरीक्षण - सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तबरेझ यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. पण त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी किंवा प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकत नाही असे म्हणत हे प्रकरण मुंबई सत्र न्यायालयाने निकाली काढले. इतकेच काय तर ज्यावेळी ही कारवाई करण्यात आली त्यावेळी दुकानाचा मालक तबरेझ कुरेशीच्या उपस्थितीवरही शंका उपस्थित करण्यात आली. हल्ला करण्यात आला तर त्या हल्ल्याची बद्दलची माहिती हल्ल्यात वापरले गेलेले शस्त्र किंवा अन्य कोणतेही निरीक्षण आरोपात दिसून आलेले नाही. त्यामुळे आरोपीवर दोष सिद्ध करण्यात अपयश आल्याने अखेर कोर्टाने आरोप करण्यात आलेल्या तबरेजला क्लिनचीट दिली.

अखेर न्याय मिळाला - तसेच फिर्यादींनी केलेल्या आरोपांच्या सत्यतेबाबतही न्यायालयाने सवाल उपस्थित केले होते. बीएमसीच्या तत्कालीन निरीक्षकांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्याआधारवर मुंबई सत्र न्यायालयात सुरु असलेल्या या खटल्याप्रकरणी अखेर आरोपीला निर्दोष मुक्त करण्यात आले.

हेही वाचा : Shinde Govt : ठाकरे सरकारच्या कामांना स्थगिती देत शिंदे सरकारचा नव्या जीआरचा धडाका, काढले 538 जीआर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.