ETV Bharat / city

Mamata Banerjee in Mumbai - ममता बॅनर्जींकडून राष्ट्रगीताचा अवमान, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा -प्रवीण दरेकर - Praveen Darekar

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी ज्या पद्धतीने राष्ट्रगीताचा अपमान केलेला आहे ते पाहता त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला हवा, अशी मागणी भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी केली आहे. राजकारण करत असताना देशाचा विसर पडणे हे फार घातक आहे. त्याचबरोबर देशापेक्षा राजकारण मोठे नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

ममता बॅनर्जींकडून राष्ट्रगीताचा अवमान, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा -प्रवीण दरेकर

author img

By

Published : Dec 2, 2021, 8:11 AM IST

Updated : Dec 2, 2021, 9:04 AM IST

मुंबई - तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. (Mamata Banerjee in Mumbai) केंद्रात मोदीविरोधी मोट बांधण्यासाठी त्यांनी मुंबईत महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. मात्र, या दौऱ्यादरम्यान मुंबईतील वायबी सेंटर येथे सामाजिक सांस्कृतिक तसेच पत्रकार यांच्याशी संवाद साधताना त्यांना राष्ट्रगीताचा (National Anthem) सन्मान राखण्याचा विसर पडल्याचा आरोप होत आहे. ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीत म्हणायला सुरुवात केली. पण त्या राष्ट्रगीत अर्धवटच बोलल्या. इतकेच नाही तर ते माध्यमांसमोर राष्ट्रगीत खाली बसून गायल्या. त्यामुळे ममता दीदींकडून राष्ट्रगीतचा अवमान झाला, असा आरोप आता विरोधकांकडून केला जातोय.

प्रतिक्रिया देताना प्रविण दरेकर

नेमकं काय झालं होत

मुंबईतील वायबी सेंटर येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांशी दुपारी ममता बॅनर्जींचा वार्तालाप होता. या वार्तालापा नंतर ममता बॅनर्जी राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार (Mamata Pawar Meet) यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या दक्षिण मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी जाणार होत्या. ३ वाजता ही भेट नियोजित होती. परंतु, या वार्तालापास त्यांना उशीर झाल्या कारणाने ममता बॅनर्जी घाईत आहेत हे त्यांच्या हालचालीवरून स्पष्ट दिसत होत. अशातच कार्यक्रम संपल्यावर राष्ट्रगीत सुरू झाल तेव्हा ममता बॅनर्जी यांनी बसूनच राष्ट्रगीताला सुरुवात केली त्यावेळी त्या खाली बसलेल्या होत्या. त्यानंतर त्या बोलता बोलता जागेवरुन उठल्या. यावेळी त्या राष्ट्रगीच्या उर्वरित ओळी बोलू लागल्या. त्यानंतर त्यांनी 'जय महाराष्ट्र, जय बंगाल, जय भारत', अशी घोषणा केली. ममता बॅनर्जींच्या या वागण्यावर सध्या विरोधकांकडून टीका होत आहे.

ममता बॅनर्जी वर गुन्हा दाखल करावा

ममता बॅनर्जी यांनी ज्या पद्धतीने राष्ट्रगीताचा अपमान केलेला आहे ते पाहता त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला हवा, अशी मागणी भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. राजकारण करत असताना देशाचा विसर पडणे हे फार घातक आहे. त्याचबरोबर देशापेक्षा राजकारण मोठे नाही असेही त्यांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी या राजकारणासाठीच मुंबईमध्ये आल्या होत्या, परंतु त्यांना राष्ट्रगीताचा विसर पडला ही खेदाची बाब आहे असेही ते म्हणाले आहेत.

राष्ट्रगीताबद्दल कायद्यात नेमकी काय तरतूद आहे

"आपल्या राज्यघटनेमध्ये मुलभूत कर्तव्य नमूद केले आहेत. त्या मुलभूत कर्तव्यांमध्ये अनुच्छेद 51 (A) प्रमाणे राष्ट्रगीत, राष्ट्रीय झेंडा आणि राष्ट्रीय मानचिन्हांचा योग्य पद्धतीने आदर केला पाहिजे. त्याचप्रमाणे केंद्रीय पातळीवर असणारा Prevention of Insult National Honour Act या नावाचा 1971 सालाचा कायदा आहे. त्या कायद्यात कलम 3 असं म्हणतं की, एखाद्या ठिकाणी राष्ट्रगीत चालू असताना ते राष्ट्रगीत म्हणायला प्रतिबंध करणं किंवा जी लोकं राष्ट्रगीत म्हणत आहेत त्यांना अडथळा निर्माण केला तर तो गुन्हा धरला जातो. तसं केल्यास तीन वर्षापर्यंतची शिक्षा ठोठावली जाऊ शकते"

हेही वाचा - Mamata Banerjee Slammed Modi : छातीचा आकार किती असो, कोणीही अजिंक्‍य नाही - ममता बॅनर्जींचा मोदींवर निशाणा

Last Updated : Dec 2, 2021, 9:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.