मुंबई - विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आगीनंतर राज्यभरातील रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या फायर ऑडिटचा रिपोर्ट दहा दिवसात दिले जाणार असून, ज्या रुग्णालयांकडून आग प्रतिबंधक उपाय योजनांच्या नियमांचे पालन केले गेले नसेल त्या रुग्णालयाचे परवाने रद्द करण्याचा इशारा आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आग प्रतिबंधक उपाययोजनांचे नियम मोडणार्या रुग्णालयांचे धाबे दणाणले आहेत.
विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीनंतर हॉस्पीटलमधील अग्निसुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर नेहमीप्रमाणे सर्व रुग्णालयांचे फायर ऑडीट करण्याची घोषणा आऱोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. तसेच येत्या 10 दिवसात या रुग्णालयात आग विरोधक उपायोजनांची काय अवस्था आहे? याच ऑडिट केले जाणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. या ऑडीटचा रिपोर्ट 10 दिवसात आरोग्यमंत्र्यांनी मागवला असून यात ज्या रुग्णालयात त्रुटी जाणवतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. तसेच ज्या हॉस्पिटलने आग विरोधक उपायोजनांबद्दल गांभीर्याने घेतले नसेल त्यांचा परवानाही रद्द होऊ शकतो, असे संकेत आरोग्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.
रुग्णालयांच्या फायर ऑडिटचे निर्देश, मात्र मुंबईत आग प्रतिबंधक उपाय योजनांचे तीन तेरा ! - virar hospital fire
विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आगीनंतर राज्यभरातील रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या फायर ऑडिटचा रिपोर्ट दहा दिवसात दिले जाणार असून, ज्या रुग्णालयांकडून आग प्रतिबंधक उपाय योजनांच्या नियमांचे पालन केले गेले नसेल त्या रुग्णालयाचे परवाने रद्द करण्याचा इशारा आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडून देण्यात आला आहे.