ETV Bharat / city

INS Visakhapatnam : स्वदेशी बनावटीचे आयएनएस विशाखापट्टण आजपासून सेवेत रुजू - इंडो-पॅसिफिक

युद्धनौका INS विशाखापट्टणम हि 163 मीटर लांब असून 17 मीटर रुंद आहे.वजन 7,400 टन आहे. ही युद्धनौका अतिशय आधुनिक आहे. ही भारतातील सर्वात लांब विनाशकारी युद्धनौका आहे, ज्यावर 50 अधिकाऱ्यांसह सुमारे 300 नाविक तैनात केले जाऊ शकतात.

आयएनएस विशाखापट्टण
आयएनएस विशाखापट्टण
author img

By

Published : Nov 21, 2021, 2:09 PM IST

मुंबई - पाकिस्तान आणि चीन सारख्या शत्रू पासून संरक्षण करण्यासाठी भारत देखील जोरदार तयारी करत आहे. देशाच्या सागरी सीमा करण्यासाठी (The country's maritime borders) स्वदेशी बनवटीचे आयएनएस विशाखापट्टणमचा (INS Visakhapatnam) भारतीय नौदलात (Indian Navy) समावेश करण्यात आला. आजपासून ही युद्धनौका (Warship) देशाच्या सेवेत रुजू होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांच्या उपस्थितीत मुंबईच्या नेव्हल डॉकयार्डमध्ये (Naval Dockyard Mumbai) हा कार्यक्रम पार पडला.

'163 मीटर लांब जहाज शक्तिशाली कोलकाता क्लास डिस्ट्रॉयरचे (Kolkata Class Destroyer) तंत्रज्ञान अपग्रेड आहे आणि ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. अत्याधुनिक सेन्सर पॅकेज (Sensor package) आणि शस्त्रास्त्रांसह, हे जगातील सर्वात तांत्रिकदृष्ट्या प्रगत मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशकांपैकी एक असेल. यामध्ये वापरलेली सिस्टीम वैशिष्ट्ये आजच्याच नव्हे तर भविष्यातील गरजा पूर्ण करणार आहेत. त्याचे कार्यान्वित होणे आपल्याला आपल्या प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या सागरी शक्ती, जहाजबांधणीचे पराक्रम आणि गौरवशाली इतिहासाची आठवण करून देते असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

सागरी मार्गाची सुरक्षा पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची झाली आहे. आम्ही नियमांवर आधारित, नॅव्हिगेशनचे स्वातंत्र्य, मुक्त व्यापार आणि सार्वत्रिक मूल्याच्या इंडो-पॅसिफिकची (Indo-Pacific) कल्पना करतो, ज्यामध्ये सर्व सहभागी देशांच्या हितांचे रक्षण केले जाते. यामध्ये एक महत्त्वाचा देश असल्याने या क्षेत्राच्या सुरक्षेमध्ये आपल्या नौदलाची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे. पुढील एक किंवा दोन वर्षांत, म्हणजे 2023 पर्यंत, जगभरातील सुरक्षेवरील खर्च 2.1 ट्रिलियन पर्यंत पोहोचणार आहे. आज आम्हाला आमच्या क्षमतांचा पुरेपूर वापर करण्याची आणि देशाला स्वदेशी जहाज बांधणीचे केंद्र बनवण्याच्या दिशेने वाटचाल करण्याची पूर्ण संधी आहे असेही सिंह यांनी सांगितले.

सर्वात लांब विनाशकारी

युद्धनौका INS विशाखापट्टणम हि 163 मीटर लांब असून 17 मीटर रुंद आहे.वजन 7,400 टन आहे. ही युद्धनौका अतिशय आधुनिक आहे. ही भारतातील सर्वात लांब विनाशकारी युद्धनौका आहे, ज्यावर 50 अधिकाऱ्यांसह सुमारे 300 नाविक तैनात केले जाऊ शकतात.

INS विशाखापट्टणम शत्रूंचा कर्दळकाळ

अनेक वर्षं या वरती चाचण्या झाल्यानंतर शत्रुंचा कर्दळकाळ आयएनएस विशाखापट्टणम आता नौदलात सामील होण्यासाठी सज्ज झाली आहे. या युद्धनौकेवर अनेक आधुनिक शस्त्रे तैनात करण्यात आली आहेत. स्वदेशी बनावटीचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र आयएनएस विशाखापट्टणमवर तैनात करण्यात आले आहे. त्यावर तैनात केलेले क्षेपणास्त्र 70 किमी अंतरावरुन हवेत उडणारे शत्रूचे लढाऊ विमान नष्ट करू शकते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.