ETV Bharat / city

Kirit Somaiya : ठाकरे सरकारमधील घोटाळेबाजांचे तेरावे घालणार : सोमय्यांचा इशारा

author img

By

Published : Apr 20, 2022, 5:24 PM IST

भाजप नेते किरीट सोमय्यांची आयएनएस विक्रांत निधी अपहार प्रकरणी ( INS Vikrant Fund Fraud Case ) आर्थिक गुन्हे शाखेकडून ( Economic Offences Wing Mumbai Police ) चौकशी सुरु ( Kirit Somaiya Enquiry ) आहे. आज तिसऱ्या दिवशीची चौकशी संपल्यानंतर सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर जोरदार वार ( Kirit Somaiya Criticized Thackeray Government ) केला. ठाकरे सरकारमधील घोटाळेबाजांचं तेरावं घातल्याशिवाय गप्प बसणार ( Kirit Somaiya Vs Mahavikas Aghadi ) नाही, असा इशारा सोमय्या यांनी दिला.

ठाकरे सरकारमधील घोटाळेबाजांचे तेरावे घालणार : सोमय्यांचा इशारा

मुंबई - आयएनएस विक्रांत निधी अपहारप्रकरणी ( INS Vikrant Fund Fraud Case ) आर्थिक गुन्हे शाखेकडून ( Economic Offences Wing Mumbai Police ) किरीट सोमय्यांची चौकशी सुरू ( Kirit Somaiya Enquiry ) आहे. आज तिसऱ्या दिवशी चौकशी संपल्यानंतर सोमय्यांनी ठाकरे सरकारमधील घोटाळेबाजांचे तेरावे घालणार असल्याचा थेट इशारा ( Kirit Somaiya Criticized Thackeray Government ) दिला. त्यामुळे आगामी काळात सोमय्या विरोधात आघाडी सरकार असा सामना रंगणार ( Kirit Somaiya Vs Mahavikas Aghadi ) आहे.

ठाकरे सरकारविरोधात संताप : आयएनएस विक्रांत प्रकरणी जमा केलेला ५७ कोटी रुपयांचा निधी राज्यपाल कार्यालयाला जमा न करता अपहार केल्याच्या आरोपाखाली किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेकडे या प्रकरणी चौकशी सुरू आहे. सलग तिसऱ्या दिवसाची चौकशी संपल्यानंतर किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकार विरोधात संताप व्यक्त केला. तेरा तास काय तेरा दिवस चौकशी करा. न्यायालयाने आम्हाला दिलासा दिला आहे. नील सोमय्यालाही संरक्षण दिले आहे. तसेच ठाकरे सरकारने दाखल केलेला गुन्हा बनावट आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवल्याचे सोमय्यांचे म्हणणे आहे.

आम्ही घाबरणार नाही : ठाकरे सरकारचा दबावाला आम्ही घाबरत नाही. माझ्या ९० वर्षाच्या आईनेही थेट मुख्यमंत्री ठाकरे यांना निरोप पाठवून सोमय्या परिवाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. माझे संपूर्ण कुटुंब चौकशीसाठी हजर राहायला तयार आहे. तुम्ही कितीही खोटे गुन्हे दाखल करून दबाव टाकायचा प्रयत्न केला तरी घाबरणार नाही. मात्र ठाकरे सरकारच्या घोटाळेबाजांचा तेरावे करूनच थांबणार, असा इशारा सोमय्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.

महाराष्ट्रात सोमय्या परिवार देशभक्त : ठाकरे सरकार सत्तेवर आल्यापासून जनतेची लुबाडणूक, घोटाळे केले आहेत. हिंदुस्थानात देशभक्त नाही, असे ठाकरे सरकारला वाटत होते. मात्र महाराष्ट्रात सोमय्या परिवार त्यासाठी हजर आहे, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्रातील जनतेने एवढा उद्धटपणा कधीही पाहिलेला नव्हता. मात्र हे माफियांचे सरकार जास्त काळ चालणार नाही, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.

१२ आरोपाप्रमाणे १२ एफआयआर करा : संजय राऊत तुमच्यात हिंमत होती, तर ५७ कोटींची एफआयआर का केली नाही? अमित शहांना ७५०० कोटी दिल्याचा का उल्लेख नाही.? नील सोमय्याच्या कंपनीवर का एफआयआर दाखल केले नाही? राऊत डरपोक आहेत. माफिया सरकार उपयोग करून तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला दाबू शकणार नाही. राऊत यांच्यात हिमंत असेल तर १२ आरोपप्रमाणे १२ गुन्हे नोंदवा, असे आव्हान सोमय्यांनी संजय राऊत यांना दिले.

आता बाकीच्यांचा नंबर : महाविकास आघाडीतील २६ घोटाळे मी बाहेर काढले असून १८ नेते त्यात अडकले आहेत. अनेकांच्या मालमत्ता जप्त झाल्या. काहीना न्यायालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत. काही जेलमध्ये गेलेत तर काही बेलवर बाहेर आहेत. काही हॉस्पिटलमध्ये आहेत. आता ठाकरे परिवाराची चौकशी सुरू झाली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा मेहुण्याची एक मालमत्ता जप्त झाली आहे. आता बाकीच्यांचा नंबर आहे, असे सोमय्या म्हणाले.

हेही वाचा : INS Vikrant Fraud Case : किरीट सोमैयांची 3 तास चौकशी; बाहेर आल्यानंतर म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.