ETV Bharat / city

INS Vikrant Fraud Case : किरीट सोमैयांची 3 तास चौकशी; बाहेर आल्यानंतर म्हणाले...

आयएनएस विक्रांत युद्धनौकेच्या ( INS Vikrant Fraud Case ) बचावासाठी गोळा केलेल्या निधीबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून भाजपचे नेते किरीट सोमैयांची तीन तास चौकशी करण्यात ( Kirit Somaiya Appears Before Mumbai Police ) आली. किरीट सोमैया ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

kirit somaiya
kirit somaiya
author img

By

Published : Apr 18, 2022, 4:54 PM IST

मुंबई - आयएनएस विक्रांत युद्धनौकेच्या ( INS Vikrant Fraud Case ) बचावासाठी गोळा केलेल्या निधीबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून भाजपचे नेते किरीट सोमैयांची तीन तास चौकशी करण्यात आली. पुढील तीन दिवस याच प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशी पार पडल्यानंतर त्यांनी काहीच शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली ( Kirit Somaiya Appears Before Mumbai Police ) आहे.

आयएनएस विक्रांतच्या घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमैयांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सोमैयांनी न्यायालयात अटकपूर्ण जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने त्यांना दिलासा देत चौकशीला जाण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे किरीट सोमैया ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.

किरीट सोमैया म्हणाले की, न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास आहे. न्यायालयाने आपल्याला चौकशीला सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आपण चौकशीला सामोरे जाणार. आपण न्यायव्यवस्थेचा सन्मान करतो, 'सत्यमेव जयते', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण? - विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी भाजप नेते किरीट सोमैयांनी 2014 साली पैसै गोळा करण्याची मोहीम सुरु केली होती. त्यामध्ये 57 ते 58 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली होती. ती रक्कम किरीट सोमैयांनी लाटून निवडणूक लढण्यासाठी वापरल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊतांनी केला होता. त्यानंतर याप्रकरणी सोमैयांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा - Custody Of Nawab Malik : नवाब मलिक यांचा कोठडीतील मुक्काम वाढला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.