मुंबई - माझगाव डॉकमध्ये प्रोजेक्ट 17 ए अंतर्गत बांधण्यात आलेल्या पहिल्या युद्ध नौकेचे म्हणजेच आयएनएस निलगिरीचे जलावतरण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.
हेही वाचा - देशातील सर्वात मोठा ड्रॉय डॉक संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते नौदलाला समर्पित
आयएनएस निलगिरी युद्ध नौका शिवालीक श्रेणीची आहे. याचे वजन 2738 टन इतके असून तिची लांबी 149 मीटर आहे. या नौकेचे वैशिष्ट्य म्हणजे ही युद्ध नौका रडारच्या टप्प्यात येत नाही. यावर अत्याधुनिक सेन्सर आणि शस्त्रास्त्रांचा साठा आहे. 2 डिझेल आणि 2 गॅस टर्बाइनद्वारे या नौकेला इंधन पुरवठा होतो.
हेही वाचा - मांडवा समुद्र किनारी आलेली 'ती' वस्तू बॉम्ब नसून जहाजावरील दिशादर्शक
प्रोजेक्ट 17 ए अंतर्गत भारतीय नौदलासाठी 7 युद्ध नौकांची निर्मिती करण्यात येणार आहे. यापैकी 4 युद्ध नौकांची निर्मिती माझगाव गोदीत केली जाणार आहे.