मुंबई - क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान एनसीबीकडून 2 ऑक्टोंबरला पकडल्यानंतर 27 दिवसानंतर आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला होता. जामीन देत यावेळी न्यायालयाने काही अटींवर आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आला होता. त्याचअनुषंगाने आर्यन खान आज एनसीबी कार्यालयात हजर राहिला. जामीन मिळाल्यानंतर तो पहिल्यांदाच NCB कार्यालयात हजर राहिला आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर रोजी कार्डेलिया जहाजावर धाड टाकली होती. यावेळी जहाजावर रेव्ह पार्टी सुरु असल्याचे उघडकीस आलं होतं. या ठिकाणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. आर्यन खान हा सध्या जेलमध्ये आहे. मात्र, त्याच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनचे व्हाट्सअॅप चॅट मिळवले होते. यात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. यात अभिनेत्री अनन्या पांडे हिचंदेखील नाव आहे. आर्यन खान आणि अनन्या यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचं एनसीबी अधिकाऱ्यांच म्हणणं आहे. या दोघांतील व्हाट्सअॅप संवाद एनसीबी अधिकाऱ्यांनी कोर्टात सादर केला होता. त्यामुळे आर्यनला जामीन मिळण्यास अडचण झाली.
पंच प्रभाकर साईल याचे गौप्यस्फोट
मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाही आहेत. याच दरम्यान याप्रकरणातील मोठा गौप्यस्फोट झाला आहे. याप्रकरणात अटकेत असलेला आर्यन खानच्या सुटकेसाठी २५ कोटी रुपयांचा सौदा झाल्याचा मोठा खुलासा किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईलने केला आहे. प्रभाकर साईल हा क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात पंच होता. मात्र प्रभाकरने स्वतःचा व्हिडिओ व्हायरल करून याप्रकरणातील मोठं बिंग फोडलं आहे. यामुळे सध्या एकच खळबळ माजली आहे.
क्रूझ ड्रग्ज पार्टी जप्त केले
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने कोर्टात सादर केलेल्या माहितीनुसार, पार्टीतून १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी, २१ ग्रॅम चरस आणि एमडीएमएच्या २२ गोळ्या जप्त केल्या होत्या त्याचबरोबर १ लाख ३३ हजार रुपये रोख सुद्धा क्रुझवर एनसीबीने जप्त केले.