ETV Bharat / city

'महाराष्ट्रातल्या कोरोना स्थितीची माहिती पंतप्रधानांना दिली' - devendra fadnavis in delhi

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि राज्यातील उपाययोजनांची स्तिथी काय आहे, याबाबत पंतप्रधान मोदी यांना अवगत केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

devendra fadnavis
विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Jul 18, 2020, 2:09 AM IST

Updated : Jul 18, 2020, 5:48 AM IST

मुंबई - राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून जनतेची दुःख आणि भावना मांडणे हे कर्तव्य आहे, या भावनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या कोरोना स्तिथीची माहिती दिल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत सांगितले. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आपल्या शिष्टमंडळासह दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून, त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. कोरोना काळात महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेतला आहे . या दौऱया दरम्यान नोंदवलेल्या निरीक्षणांशी पंतप्रधानांना अवगत केले, असेही फडणवीस म्हणाले.

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि राज्यातील उपाययोजनांची स्तिथी काय आहे, याबाबत पंतप्रधान मोदी यांना अवगत केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. केंद्र सरकार आधीपासूनच महाराष्ट्र सरकारला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करत आहे. यापुढे ही केंद्राचे सहकार्य असणार आहे. या भेटी दरम्यान पंतप्रधानांनी मुंबई, पुणे, मराठवाडा तसेच विदर्भातील परिस्तिथी ही जाणून घेतली. सरकारच्या कामकाजातील उणिवा त्यांच्या निदर्शनात आणून देणे आवश्यक आहे. तज्ज्ञ तसेच डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर ज्या बाबतीत सुधारणांची आवश्यकता आहे, यासंबंधीची माहिती ही पंतप्रधानांना दिली. रुग्ण संख्या कमी कशी करता येईल यावर ही चर्चा झाली असल्याचे फडणवीस म्हणाले.

दिल्लीत कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आल्याने हळूहळू रुग्णसंख्या कमी होत आहे. याच प्रमाणे मुंबईत तपासण्यांचे प्रमाण वाढवण्याची मागणी वारंवार केली जात आहे. मुंबईसह राज्यातील इतरत्र भागातही तपासण्या वाढवण्याची विनंती भेटीदरम्यान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर, अन्न आणि पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेतली असून, साखर उत्पादक आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली . केंद्र सरकार साखर उत्पादकांच्या प्रश्नावर नक्कीच तोडगा काढेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. तर, शनिवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Last Updated : Jul 18, 2020, 5:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.