नवी मुंबई: मागील वर्षीच्या तुलनेत ज्वारी, बाजरी आणि तांदळाच्या दरात मोठी वाढ Big hike in rice prices झाली आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसला असून गरिबांची भाकरी महागली आहे. अवकाळी पाऊस, इंधनांचे वाढते दर आणि साठेबाजीमुळे मागील वर्षाच्या तुलनेत ज्वारी, बाजरी व तांदळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गतवर्षी वाशीतील घाऊक बाजारात ज्वारीचा दर 21 ते 39 रुपये किलो होता.
गरिबांची भाकरी महागली तो सध्या 28 ते 45 रुपये किलो झाला आहे. मागील वर्षी बाजरीला 18 ते 25 रुपये किलो दर मिळत होता. सध्या बाजरीला 24 ते 35 रुपये दर मिळत आहे. तसेच गेल्यावर्षी तांदळाला 30 ते 42 रुपये किलो दर मिळत होता. तो सध्या 29 ते 46 रुपये किलोवर पोहोचला आहे. अर्थात, मागील वर्षीच्या तुलनेत ज्वारी, बाजरी व तांदळाच्या दरात अनुक्रमे 7 रु, 6 रु. आणि 4 रुपयांनी वाढ झाली आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसला असून गरिबांची भाकरी महागली आहे.
सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले धान्याच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. प्रामुख्याने सोलापूरमध्ये तर काही प्रमाणात लातूर, विदर्भामध्ये ज्वारी- बाजरी घेतली जाते. तांदळाच्या किमतीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत चांगलीच वाढ झाली आहे. तांदळाचे उत्पादन हे बिहार, हरयाना, यूपी, पंजाब, मध्य प्रदेश या राज्यांत मोठ्या प्रमाणात होते. मात्र डिझलेचे भाव वाढल्यामुळे वाहतूक खर्चात वाढ होत असल्याने दरात वाढ झाली आहे.
गुजरातमध्येही ज्वारीला वाढती मागणी स्थूलपणा कमी करण्यासाठी ज्वारी, बाजरीच्या भाकरीचा आग्रह धरला जातो. त्यामुळे शहरात ज्वारीची मागणी दुपटीने वाढली आहे. अधिक पैसे देऊन राज्यातून ज्या ठिकाणांहून ज्वारी येत होती. तिथून ती पुरेशी उपलब्ध होत नाही. मुंबई इतकीच गुजरातमध्येही ज्वारीला वाढती मागणी आहे. मुंबईपेक्षा गुजरातमध्ये ज्वारीला मिळणारा दर अधिक असल्याने उत्पादकांचा त्या ठिकाणी माल पाठवण्याकडे अधिक कल आहे.