ETV Bharat / city

Industrialist Avinash Bhosale : उद्योगपती अविनाश भोसलेंचा ईडीने घेतला ताबा; सत्र न्यायालयात हजर करणार - डीएचएफएल आणि येस बँक

डीएचएफएल आणि येस बँक (DHFL and Yes Bank) प्रकरणात उद्योगपती अविनाश भोसले (Industrialist Avinash Bhosale) त्यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल करत अटक केली होती आता या प्रकरणात ईडीने अविनाश भोसले यांचा ताबा घेतला आहे (Avinash Bhosale taken over by ED). आज त्यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात हजर करण्यात येणार ( will appear in Sessions court) आहे. त्यावेळी ईडीकडून कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Avinash Bhosale
अविनाश भोसलें
author img

By

Published : Jun 28, 2022, 12:56 PM IST

मुंबई: उद्योगपती अविनाश भोसले यांना आर्थर रोड जेल मधुन ताब्यात घेण्यात आले आहे सीबीआयने अविनाश भोसले यांना अटक केली होती त्यांना 10 दिवसाची सीबीआय कोठडी दिल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. ते न्यायालयीन कोठडीत असताना ईडीने त्यांचा ताबा घेतला आहे. डीएचएफएल प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. यातूनच त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली.

गेल्या वर्षी जून 2021 मध्ये अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांच्या नावावर असलेली तब्बल 40 कोटी 34 लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती. विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत ही कारवाई झाली होती. डीएचएफएल घोटाळा प्रकरणानंतर त्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. अविनाश भोसले आज कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे मालक आहेत. रिअल इस्टेट किंग अशी त्यांची पुण्यामध्ये ओळख आहे. बांधकाम व्यवसायात आल्यानंतर सुरुवातीला कंत्राटदार ते आता पुण्यातील रिअल इस्टेट किंग अशी त्यांची ओळख आहे.

हेही वाचा : पत्रकार मोहम्मद जुबैरला पोलिस कोठडी, आज कोर्टात हजर करणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.