ETV Bharat / city

Sheena Bora murder case: इंद्राणी मुखर्जीकडून राहूल मुखर्जीच्या उलटतपासणीचा अर्ज; सत्र न्यायालयाने फेटाळला

शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार आणि शीना बोरा चा प्रियकर राहुल मुखर्जी सोबत बोलू देण्याची परवानगी मिळावी याकरिता अर्ज दाखल केला होता. हा अर्ज विशेष सीबीआय कोर्टाने फेटाळून ( Special CBI Court ) लावला आहे. सध्या राहुल मुखर्जी न्यायालयात साक्ष नोंदणी सुरू आहे. यादरम्यान राहुलने अनेक धक्कादायक खुलासे देखील केले आहेत.

इंद्राणी मुखर्जी
Indrani Mukherjee'
author img

By

Published : Jun 29, 2022, 10:35 AM IST

मुंबई - शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार आणि शीना बोरा चा प्रियकर राहुल मुखर्जी सोबत बोलू देण्याची परवानगी मिळावी याकरिता अर्ज दाखल केला होता. हा अर्ज विशेष सीबीआय कोर्टाने फेटाळून लावला आहे. सध्या राहुल मुखर्जी न्यायालयात साक्ष नोंदणी सुरू आहे. यादरम्यान राहुलने अनेक धक्कादायक खुलासे देखील केले आहेत. सरकारी पक्षाच्या वकिलांनी राहुलची उलटतपासणी पूर्ण केल्यानंतर आपल्यालाही त्याला काही प्रश्न करायचे ( Indrani Mukherji want to question Rahul Mukerji )आहेत. अशी विनंती इंद्राणी मुखर्जीने हिने केली होती. आपल्याकडे कायद्याची पदवी नसली तरी उलटतपासणी ( Cross examination )आपण करू शकतो, असे तिने याचिकेत नमूद केले होते.

पत्रात आणखी काय लिहिले आहे? - सीबीआय संचालकांना लिहिलेल्या पत्रात इंद्राणीने म्हटलंय की, नुकतीच मी तुरुंगात एका महिलेला भेटले जिने काश्मीरमध्ये शीना बोराला भेटली होती असे तिने ( Shina Bora In Kashmir ) सांगितले. इंद्राणी मुखर्जीने सीबीआय संचालकांना शीना बोराचा काश्मीरमध्ये शोध घ्यावा अशी मागणी इंद्राणीनं केली आहे. इंद्राणी मुखर्जी शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी असून ती 2015 पासून मुंबईच्या भायखळा कारागृहात बंद आहे. तसेच इंद्राणी मुखर्जीने नुकताच सर्वोच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज देखील केला आहे.

फॉरेन्सिक रिपोर्ट काय म्हणतो? - एम्सच्या फॉरेन्सिक विभागाने तयार केलेल्या या अहवालानुसार 2015 साली तपासादरम्यान सापडलेला सापळा हा शीना बोराचाच असल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. सीबीआयच्या चार्जशीटसोबत जोडलेला वैद्यकीय चाचणी अहवाल हा सापडलेल्या सापळ्याच्या वेगवेगळ्या चाचण्या केल्यानंतरच तयार करण्यात आला आहे. उंची, वय, लिंग या सर्व बाबी तो सापळा शीना बोराचाच असल्याचं स्पष्ट करणाऱ्या होत्या. 23 वर्षीय शीना बोराची गळा आवळून हत्या करण्यात आली होती, असंही अहवालात नमूद केलं आहे. वेगवेगळ्या फॉरेन्सिक तज्ज्ञांचं मत, प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती, आरोपीचा कबुलीजबाब, पुरावे या सगळ्यांच्या आधारे शीना बोराची हत्या झाल्याचं सीबीआयनं स्पष्ट केलं होतं.

काय आहे प्रकरण - इंद्राणी मुखर्जीने एकूण तीन लग्न केली आहेत. त्या नात्यात तिला पहिल्या पतीपासून मुलगी झाली. तिचं नाव शीना बोरा होते. इंद्राणी मुखर्जीचा तिसरा नवरा पीटर मुखर्जी हा आहे. त्याने इंद्राणी मुखर्जीचा मुलगा राहूल आणि शीना बोराचे अफेअर असल्याचे सांगितले. इंद्राणी आणि पीटर मुखर्जी दोघेही यामुळे अस्वस्थ होते. एप्रिल 2012 मध्ये नवी मुंबईजवळील जंगलात 24 वर्षीय शीनाची कारमध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली होती आणि शेजारच्या रायगड जिल्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये ही हत्या उघडकीस आल्यानंतर इंद्राणीशिवाय तिचा ड्रायव्हर श्यामवर राय आणि संजीव खन्ना यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली होती. इंद्राणीचा पती पीटर यालाही नंतर या प्रकरणात आरोपी बनवून अटक करण्यात आली होती. तपासानुसार शीनाच्या राहुलसोबतच्या संबंधांना इंद्राणीचा विरोध होता. याशिवाय आर्थिक वाद हा हत्येमागील संभाव्य कारण होतं. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणी इंद्राणी मुखर्जी 2015 पासून मुंबईतील भायखळा कारागृहात बंद आहे.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : महाविकास आघाडीची अग्निपरीक्षा, बहुमत चाचणीसाठी राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.